गर्भवतीची चिमुकलीसह विहिरीत उडी
रामटेक : अल्पवयीन मुलाला फोनवरून एका रॅकेटमध्ये फसवण्याची धमकी देत पाच हजार रुपयांची मागणी करून मानसिक दबाव टाकण्यात आला होता. बदनामी होईल या भीतीने मुलाने गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर रामटेक पोलिसांनी झारखंड येथून अटक केली.
10 डिसेंबर 2024 रोजी रामटेक पोलिस ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी मृतकाच्या वडिलांनी फिर्याद दिली होती की, मोबाईल क्रमांक 9820617082 व 8434391741 वरून मृतकास फोन करून सेक्स रॅकेटमध्ये फसवण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच 5 हजार रुपये न दिल्यास बदनामी करण्याची भीती दाखवली होती. त्यामुळे मृतकाने मानसिक तणावात येऊन आत्महत्या केली होती. या तक्रारीवरून रामटेक पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेदेखील वाचा : सिलेंडरने डोके फोडून मित्राची हत्या; चार दिवस घरातच पडून होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्…
या तपासादरम्यान 22 डिसेंबर 2024 ओमप्रकाश प्रसाद दुलारचंद महतो (वय 35, रा. बिच टोला, ग्राम बरवां, थाना बरहठ्ठा, जि. हजारीबाग, झारखंड) याला अटक करण्यात आली होती. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तापेश्वर प्रसाद दुलारचंद महतो (वय 25, रा. बरमा, ता. बरही, जि. हजारीबाग, झारखंड) हा तेव्हापासून फरार होता.
रामटेक पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक साधनांच्या आधारे सखोल तपास केला. तपासादरम्यान आरोपी हा झारखंड येथील राहत्या घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. अखेर 6 जून 2025 रोजी रामटेक पोलिसांनी तापेश्वर महतो याला त्याच्या राहत्या घरी झारखंडमधून अटक केली. पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहेत.