Maharashtra Assembly Election : नगर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात किती टक्के झाले मतदान ? काय सांगते आकडेवारी
गिरीश रासकर / अहिल्यानगर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहेत. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागांमध्ये मतदानासाठी मतदारांनी तसेच राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मतदान केंद्रांवर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. नगर शहर मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदानाला प्रारंभ झाला. मात्र सकाळच्या सत्रात मतदाना उत्साह काही ठिकाणी कमी प्रमाणात दिसून आला. जाणून घेऊयात सकाळच्या सत्रातील मतदानाची आकडेवारी काय होती ?
सकाळच्या सत्रात अहिल्यानगर जिल्हा विभागात ५.९३ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सकाळपासूनच पथकासह मतदान केंद्राची व सद्य परिस्थितीची पाहणी केली. नगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांसह आजी-माजी आमदारांनी तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी मतदारसंघातील उमेदवारांनी सकाळीच आपल्या कुटुंबात बरोबर मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असता सकळी अहिल्य़ानगरमध्ये दोन प्रकारची चित्रं दिसून आली. काही मतदानाचा कल हा कमी दिसून आला आहे. मात्र असं असूनही काही ठिकाणी सकाळी मतदारांच्या लांबच लांब रांगा सुद्धा पाहायला मिळाल्या. शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आपला हक्क बजावताना दिसून आले . याच वेळेला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे पथकासह नगर शहरांमध्ये दाखल झाले व त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करत मतदान केंद्रामध्ये जाऊन सर्व परिस्थितीची माहिती जाणून घेतली. व प्रशासनाला आवश्यक त्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केल्या.
शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. कळमकर म्हणाले की, नागरिकांनी भयभीत न होता मतदानाला बाहेर पडावे. देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने प्रत्येकाने मतदान करण्याची जबाबदारी पार पाडावी असं कळमकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे कळमकर म्हणाले की, जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी सगळेजण प्रयत्न करीत आहेत. जर काही संशय कुणाही व्यक्तीला आढळला तर त्यांनी घाबरून न जाता मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवावे व जागृत मतदान करावे असे आवाहन मतदारांना यावेळी केले.
दरम्यान नगर शहरात सकाळीच मतदानाला सुरुवात झाली. परंतु दोन दिवसांपासून थंडीचा प्रभाव वाढल्याने सकाळी झालेल्या मतदानावर प्रतिसाद काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून आला. मात्र काही ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. शहरातील झेंडीगेट, माळीवाडा, मुकुंदनगर तसेच केडगाव येथील काही केंद्रांवर मोठी गर्दी पहायला मिळाली तर शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच भिंगार, केडगाव भागात असलेल्या मतदान केंद्रांवर मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. तर काही मतदान केंद्रांवर तर पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळाला.
महायुतीसंदर्भात बातम्यांसाठी इथे क्लीक करा
दरम्यान नगर शहरात मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसंच शहरातील इतर संवेदनशील मतदान केंद्रांवर देखील चोख सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे.