Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव

चित्रकूट इंटरनॅशल स्कूलच्या वतीने भारत भूषण सन्मान २.० सोहळा मोठ्या उत्साहात अहिल्यानगर शहरात साजरा करण्यात आला. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2026 | 04:25 PM
Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव

Ahilyanagar News: भारत भूषण सोहळ्यात देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा गौरव

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर शहरात भारत भूषण सन्मान २.० सोहळ्याचे आयोजन
  • देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ञांचा सोहळ्यात गौरव
  • ‘एलिट प्रिन्सिपल क्लब’ चे उद्घाटन
चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने आयोजित ‘भारत भूषण सन्मान २.०’ हा भव्य सोहळा अहिल्यानगर शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशातील विविध राज्यांतील नामांकित शाळांचे प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थाचालकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा सर्वांगीण विकास आणि संस्कारमूल्यांची जोपासना यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन आणि गणेश आरतीने झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, प्रभावी योग प्रात्यक्षिके आणि ‘शिव गर्जना’ या सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. सभागृहात शिस्त, सांस्कृतिक रंगत आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली. शाळेचे संचालक संजय चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली.

Mumbai Climate Week 2026 मध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची खास उपस्थिती

देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव यांनी ‘भारत भूषण सन्मान’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मागील वर्षी सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदाही देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. देशातील सुमारे १७५ राष्ट्रीय पातळीवरील शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ या सोहळ्यास उपस्थित होते. शिक्षणाच्या माध्यमातून भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा हा व्यापक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

परिवर्तन घडविणाऱ्या नेतृत्वाची गरज

विशेष मान्यवर आराधना राणा यांनी “शाळांमध्ये परिवर्तन घडविणारे नेतृत्व” या विषयावर मार्गदर्शन केले. नेतृत्वामध्ये अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल” या विषयावरील परिसंवादाचे सूत्रसंचालन सीमा नेगी यांनी केले. दीपिका नगरवाला, रिती मल्होत्रा, स्वाती पटेल आणि कल्पेश राठोड यांनी आधुनिक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन आणि मूल्याधारित शिक्षणावर आपले विचार मांडले.

Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक

‘एलिट प्रिन्सिपल क्लब’ चे उद्घाटन

कार्यक्रमादरम्यान ‘एलिट प्रिन्सिपल क्लब’ चे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील शाळा प्रमुखांमध्ये संवाद, समन्वय आणि नवकल्पनांची देवाणघेवाण वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणाही यावेळी करण्यात आली. सूत्रसंचालन नववीतील श्रद्धा गोड आणि पायल राऊत यांनी केले, तर सहावीतील आलिया खाटिक हिने आभार प्रदर्शन केले.

आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड

या मेळाव्यात प्राचीन शैक्षणिक परंपरेपासून ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत झालेल्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या एमबीडी समूहाच्या प्रशिक्षण विभागातील उपमहाव्यवस्थापक रिती मल्होत्रा यांनी ग्रामीण भागापर्यंत अद्यावत शिक्षण पोहोचल्यास देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षकांनी डिजिटल साधने आत्मसात करणे, सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि सक्षम नेतृत्व विकसित करणे हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ahilyanagar news principals and educationists of 175 schools across the country honored at bharat bhushan ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती
1

Ahilyanagar News: शिंगणापुरातही होईल आता निविदा प्रक्रिया, आयुक्त गेडाम यांची माहिती

Unemployment Rate 2026: देशातील बेरोजगारी दरात ५ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ; हिवाळ्यातील हंगामी घटकांचा परिणाम
2

Unemployment Rate 2026: देशातील बेरोजगारी दरात ५ टक्क्यांपर्यंत किरकोळ वाढ; हिवाळ्यातील हंगामी घटकांचा परिणाम

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!
3

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

‘लक्ष्मी निवास’ मध्ये महाशिवरात्रीच्या पूजेत निलांबरीचा कट; सिद्धूचा थरारक सामना, जान्हवीची धक्कादायक एन्ट्री!
4

‘लक्ष्मी निवास’ मध्ये महाशिवरात्रीच्या पूजेत निलांबरीचा कट; सिद्धूचा थरारक सामना, जान्हवीची धक्कादायक एन्ट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.