अजित पवार यांनी बारामतीच्या काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 in Marathi : विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपल्या पारंपरिक बारामती मतदारसंघातून लढलेले अजित पवार सकाळीच मतदानासाठी पोहोचले. मतदानानंतर ते म्हणाले की, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्याचवेळी त्यांनी आपल्या जागेवरील निवडणूक लढवणे कठीण असल्याचेही सांगितले. यामागे केवळ कुटुंबातील एक व्यक्ती समोर असल्याचे कारण त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, ‘कुटुंबातील सदस्याविरुद्ध निवडणूक लढवणे नेहमीच अवघड असते.’ यावेळी त्यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर रोख रक्कम वाटल्याच्या आरोपावरही चर्चा केली. याचा विचार बारामतीतील जनता करेल, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीच्या जागेवर अजित पवार यांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार जे त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार यांच्याशी टक्कर देत आहेत. युगेंद्र पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांच्या पक्षातून आलेले आहेत. अशा स्थितीत बारामतीत पहिल्यांदाच अजित पवार यांच्यासाठी एवढी चुरशीची लढत असल्याचे मानले जात आहे.
अजित पवार यांनी आपल्या आजारी आईलाही राजकारणात आणले, हे चुकीचे आहे, असे श्रीनिवास पवार म्हणाले. ते म्हणाले की माझी 87 वर्षांची आई आशा पवार यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यानंतरही त्यांना प्रचारासाठी आणले आहे. हे कसले राजकारण? मी एक दिवस आधी माझ्या आईला भेटलो होतो. त्या म्हणाल्या की मला रॅलीला जायचे नाही. त्यानंतरही दुसऱ्याच दिवशी अजित पवार त्यांना घेऊन आले. यावर अजित पवार यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. मात्र मत दिल्यावर त्यांनी निश्चितपणे सांगितले की, जेव्हा कुटुंबातील सदस्य समोर असतो तेव्हा लढणे कठीण असते.
तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना निर्णय घ्यायचा की पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा आहे. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघात विधानसभेची निवडणूक आज होतेय. योग्य उमेदवारा मतं देऊन सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा, असे म्हणत अजित पवार यांनी मतदानाला जाताना प्रतिक्रिया दिली. तर महाराष्ट्राची घोडदौड कायम राहिल अशा पद्धतीने मतदान करा, असं म्हणत अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील चित्र यंदा सकारात्मक असेल. बारामती ठरवतील की आता किती लीड द्यायचंय, असे म्हणत अजित पवारांनी विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 158 पक्ष विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर अपक्ष यादीत 2 हजार 086 उमेदवार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचं हे लवकरच स्पष्ट होणार आहे.