"निवडणुकांमध्ये आम्ही मशिनमध्ये भ्रष्टाचार केला…", प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याला नक्की म्हणायचं तरी काय?
Jharkhand Vidhansabha Nivadnuk : झारखंडमध्ये देखील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 13 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील एकूण 38 जागांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या टप्प्यात एकूण 528 उमेदवार रिंगणात आहेत. झारखंडमध्ये देखील भाजपसमोर तगडे आव्हान असणार आहे. झारखंडमधील सर्व बुथवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून 1 कोटी 23 लाख 58 हजार 195 लोक मतदान करणार आहेत.
20 Nov 2024 03:12 PM (IST)
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. दुसऱ्या टप्प्याचे हे मतदान सुरु असून लोकांचे सांगला प्रतिसाद मिळतो आहे. महाराष्ट्रापेक्षा झारखंडमध्ये मतदानाची टक्केवारी जास्त आहे. मात्र झारखंडमध्ये असेही एक मतदानकेंद्र आहे जिथे नीरव शांतता पसरली आहे. निरसा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या झारखंडच्या शेवटच्या बूथमध्ये सध्या शांतता आहे. भाग बंगालला लागून आहे आणि झारखंडचा शेवटचा बूथ आहे. आतापर्यंत येथे केवळ 20 टक्के मतदान झाले आहे. याठिकाणी अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त आणि उपस्थिती असल्याने मतदानासाठी मोजकेच लोक बाहेर पडले आहेत.
20 Nov 2024 02:39 PM (IST)
झारखंडमध्ये मतदानाला वेग आला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदार पूर्ण उत्साहाने लोकशाहीचा उत्सव असलेल्या या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे. झारखंड हा महाराष्ट्रापेक्षा मतदानामध्ये अग्रेसर ठरत आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत 47.92 टक्के मतदान झाले आहे. तर गिरिडीहमध्ये ४८.०१ टक्के मतदान झाले. यासह गोड्डा येथे 50.27 टक्के मतदान झाले आहे.
20 Nov 2024 01:46 PM (IST)
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे झारखंड निवडणूक प्रभारी शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "2024 च्या झारखंड विधानसभा निवडणुका राज्य वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी "रोटी, बेटी, माटी" च्या संघर्ष, तरुणांना नोकऱ्या देण्यात JMM-काँग्रेस सरकारचे अपयश, महिलांसाठी असुरक्षित परिस्थिती, वाढती घुसखोरी, बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रचंड भ्रष्टाचार या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. समृद्ध, सुरक्षित आणि भ्रष्टाचारमुक्त झारखंडसाठी भाजप-एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन चौहान यांनी मतदारांना केले आणि दावा केला की भाजप-एनडीए सरकार राज्य आणि तेथील लोकांचे भवितव्य बदलेल. सध्याच्या कारभाराविरोधात जनक्षोभामुळे भाजप-एनडीएचे सरकार स्थापन होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
20 Nov 2024 01:03 PM (IST)
झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, मधुपूरमधील बूथ क्रमांक 111 वरील मतदान कर्मचाऱ्यावर मुलांनी JMM उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचा आरोप होता, ज्याची दखल घेण्यात आली आणि पीठासीन अधिकाऱ्याने त्याला मतदानाच्या कामापासून काढून टाकले आहे.
20 Nov 2024 12:10 PM (IST)
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मतदान सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 18.14% मतदान झाले, तर झारखंडमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 38 विधानसभा जागांसाठी मतदान होत असताना 31.37% मतदान झाले. भारत निवडणूक आयोग 23 नोव्हेंबर रोजी दोन्ही राज्यांचे निकाल जाहीर करणार आहे. मतदानाच्या टक्केवारीमध्ये झारखंड महाराष्ट्रापेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे.
20 Nov 2024 11:43 AM (IST)
मतदानाच्या दिवशी गांडेय विधानसभा मतदारसंघातील जेएमएमच्या उमेदवार कल्पना सोरेन म्हणाल्या, "मला माझ्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे कारण माझा कार्यकाळ खूपच कमी होता, पण या काळात मी खूप मेहनत घेतली आहे... इतक्या कमी कार्यकाळात मी एवढी कामे केली असतील तर. त्यामुळे मी ५ वर्षात आणखी काम करेन... पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावरून हे समजू शकते की आमची अर्धी लोकसंख्या आम्हाला (जेएमएम) विशेषत: हेमंत सोरेनला ताकद देत आहे," असे मत कल्पना सोरेन यांनी व्यक्त केले आहे.
20 Nov 2024 11:11 AM (IST)
झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये झारखंडचे हे मतदान होत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. झारखंडच्या मंत्री दीपिका पांडे सिंग यांनी गोड्डा येथे मतदान केले, लोकांना लोकशाही प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आणि निवडणुकीच्या निकालांबद्दल आशा व्यक्त केली आहे.
20 Nov 2024 10:30 AM (IST)
देशातील महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. झारखंडमध्ये मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी 9 पर्यंत मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत झारखंडमध्ये १२.७१ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त ६.६१ टक्के मतदान झाले आहे. आता कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल लागतो याची उत्सुकता लागली आहे.
20 Nov 2024 10:20 AM (IST)
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जेएमएम काँग्रेस युती आणि भाजपा व स्थानिक ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन पार्टी युती यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. झारखंडच्या या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय नेत्यांसह नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला आहे. झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. बाबूलाल मरांडी यांनी गिरिडीह येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
झारखंड के प्यारे भाइयो और मेरी बहनो!
अपने लिए, अपने बच्चों के मजबूत भविष्य के लिए, जल-जंगल-जमीन की सुरक्षा के लिए, लोकतंत्र, संविधान व सामाजिक न्याय के लिए, और झारखंड के बेहतर भविष्य के लिए ज्यादा से ज्यादा संख्या में वोट कीजिए।
संविधान द्वारा दी गई अपनी शक्ति से एक ऐसी…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 20, 2024
20 Nov 2024 09:56 AM (IST)
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन झारखंडच्या नागरिकांना आवाहन केले आहे. प्रियांका गांधी यांनी लिहिले आहे की, "प्रिय झारखंडच्या बंधू आणि भगिनींनो! स्वत:साठी, तुमच्या मुलांच्या भक्कम भविष्यासाठी, जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी, लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायासाठी आणि झारखंडच्या चांगल्या भविष्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. केवळ तुमच्यासाठी काम करणारे आणि तुम्हाला पुढे नेणारे सरकार निवडण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या तुमच्या अधिकारांचा वापर करा. इंडिया आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे मत प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे.
झारखंड के प्यारे भाइयो और मेरी बहनो!
अपने लिए, अपने बच्चों के मजबूत भविष्य के लिए, जल-जंगल-जमीन की सुरक्षा के लिए, लोकतंत्र, संविधान व सामाजिक न्याय के लिए, और झारखंड के बेहतर भविष्य के लिए ज्यादा से ज्यादा संख्या में वोट कीजिए।
संविधान द्वारा दी गई अपनी शक्ति से एक ऐसी…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 20, 2024
20 Nov 2024 09:29 AM (IST)
झारखंडच्या धनबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राज सिन्हा म्हणाले, "सध्याचा कल आणि मतदारांची प्रचंड संख्या पाहता, या निवडणुकीत भाजप आपले सरकार स्थापन करणार आहे, हे स्पष्ट आहे. आम्ही बांगलादेशींचा (घुसखोर) मुद्दा उपस्थित केला. कारण हे खरे आहे की आणि लोकांना त्याबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल माहित असणे आवश्यक आहे."
20 Nov 2024 09:16 AM (IST)
झारखंडमधील लोकशाहीच्या महान उत्सवाचा आज दुसरा आणि शेवटचा टप्पा आहे. मी सर्व मतदारांना यात उत्साहाने सहभागी होऊन मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचे आवाहन करतो. या निमित्ताने मी विशेषतः माझ्या सर्व तरुण मित्रांचे अभिनंदन करतो जे पहिल्यांदाच मतदान करत आहेत. तुमचे प्रत्येक मत ही राज्याची ताकद आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.
झारखंड में आज लोकतंत्र के महापर्व का दूसरा और आखिरी चरण है। सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे इसमें बढ़-चढ़कर भागीदारी करें और वोटिंग का नया रिकॉर्ड बनाएं। इस अवसर पर पहली बार वोट डालने जा रहे अपने सभी युवा साथियों का मैं विशेष अभिनंदन करता हूं। आपका एक-एक मत राज्य की ताकत है।
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2024
20 Nov 2024 09:08 AM (IST)
झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या टप्प्यात 12.3 दशलक्ष मतदार मतदान करणार असून यामध्ये 6.08 दशलक्ष महिला मतदार आहेत. रिंगणात असलेल्या 528 उमेदवारांमध्ये 472 पुरुष, 55 महिला आणि एक ट्रान्सजेंडर आहे. मुख्य निवडणूक अधिकारी के रवी कुमार यांनी शांततापूर्वक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व तयारी केली असून तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्याबरोबर मतदारांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था सज्ज आहे.
20 Nov 2024 09:02 AM (IST)
महाराष्ट्राप्रमाणे झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये दोन प्रमुख युतींमध्ये चुरशीची लढत होत आहे. जेएमएम काँग्रेस यांची युती सत्ताधारी असून त्यांच्याविरोधात भाजपा व स्थानिक ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियन पार्टी यांची युती लढत देत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बऱ्हेतमध्ये भाजपाच्या गमालीएल हेम्ब्रोम यांच्याशी तर त्यांची पत्नी कल्पना सोरेन या गांडेमध्ये भाजपाच्या मुनिया देवी यांच्याशी लढत होणार आहे. भाजपाचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी धनवार जागेवर सीपीआय एलचे राजकुमार यादव यांच्याकडून निवडणूक लढवणार आहेत.