Amol Mitkari Target Rohit Pawar wins the election with fewer votes
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आहे. यामध्ये महायुतीचा न भुतो न भविष्यती असा लागला आहे. महायुतीच्या एकतर्फी विजयामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते निवडणुकीच्या लढतीमध्ये पराभूत झाले आहेत. तर काही नेते अगदी काठावर पास झाले आहेत. यामध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर शरद पवार गटाचे रोहित पवार आहेत. रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये अवघ्या 1240 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. यावरुन अजित पवार यांनी देखील थोडक्यात वाचला असे सांगितले. आता यावरुन अजित पवार गटाचे नेते व विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र डागले आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रीतीसंगमावर नेत्यांनी मानवंदना दिली आहे. यावेळी अजित पवार व रोहित पवार या दोघांची भेट झाली आहे. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार यांची ही प्रीतीसंगमावरील भेट आणि संवाद राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये रोहित पवार यांना सल्ला देत कर्जत जामखेडच्या निकालावर भाष्य केले. तसेच रोहित पवार यांना खाली वाकून नमस्कार करायला लावला. ये..दर्शन घे काकांचं.. थोडक्यात वाचला ढाण्या… माझी सभा झाली असती तर काय झालं असतं…यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अजित पवार व रोहित पवार गेले. या प्रसंगावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. यावरुन अमोल मिटकरी यांनी देखील टोला लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमधून त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा किती खोटा बोलतोय.बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन ,आज मस्तीत बोलतोय.जय,पार्थदादा पैकी कुणी एक जरी कर्जत जामखेड मध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता.#खोटारडा, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा किती खोटा बोलतोय.बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन ,आज मस्तीत बोलतोय.जय,पार्थदादा पैकी कुणी एक जरी कर्जत जामखेड मध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता.#खोटारडा pic.twitter.com/oREzK1fq3X
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 25, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोहित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ते माझे काका आहेत म्हणून पाया पडलो. आतातरी विचारांमध्ये भिन्नता आहे, शेवटी संस्कृतीप्रमाणे वडीलधारी व्यक्तीच्या पाया पडणं माझी जबाबदारी आहे. 2019 च्या निवडणुकीला त्यांनी मला खूप मदत केली होती. चव्हाण साहेबांच्या स्मृतिठिकाणावर भेदभाव करून चालत नाही. संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे तेच आम्ही केलं आहे. सभा झाली असती तर काही प्रमाणात वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. मात्र ते बारामतीमध्ये अडकून पडले होते. शेवटी ते मोठे नेते होते आहेत, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले होते.