Cash worth crores of rupees seized in Nagpur raid
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग जोरदार कामाला लागले आहे. राज्यामध्ये सर्व ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले असून कसून चौकशी केली जात आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी आयोग कार्यरत आहे. निवडणूक अधिकारी राजकीय नेत्यांची देखील तपासणी करत असल्यामुळे राजकारण तापले आहे. यामध्ये आता नागपूरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूरमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जमा करण्यात आली आहे.
नागपूरसह राज्यामध्ये वाहनांची अधिकाऱ्यांकडून व पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. नागपूरमध्ये काल (दि.13) पोलिसांनी मोठी छापेमारी केली आहे. पोलिसांनी एका दुचाकीवरून तब्बल 1 कोटी 35 लाख रुपये जप्त केले. पोलिसांनी दुचाकी चालकाला ताब्यात घेतलं आहे. साकीर खान हाजी नसीर खान (वय 42, रा. यशोधरा नगर) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना संशय आल्यामुळे त्याला रोखण्यात आले. जवळ असणाऱ्या रोकडबद्दल योग्य व समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यामुळे पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये पोलीस गाड्यांची कसून चौकशी करत होते. यावेळी दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. पोलिसांपासून नजर चुकवणाऱ्या या व्यक्तीची गाडी पोलिसांनी अडवली. यावेळी त्याची तपासणी घेण्यात आली. यावेळी त्या व्यक्तीकडे तब्बल कोट्यवधी रुपये रोकड स्वरुपामध्ये असल्याचे आढळून आले. नागपूरमध्ये पोलिसांना 1 कोटी 35 लाख कोटी रुपये रोख सापडले. त्याक्षणी पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. ही रक्कम कोणाची आहे? अशी विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच पैशाचे कोणतेही कागदपत्रही सादर करू शकला नाही. निवडणुकीच्यावेळी मिळालेली रक्कम पाहता पोलिसांनी पैसे आणि दुचाकी असा एकूण 1 कोटी 50 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांना मोठा घबाड सापडले आहे.
पोलिसांना अशा स्वरुपाची रोकड रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती पूर्वीच मिळाली होती. त्यामुळे नागपूर पोलिसांनी कसून तपासणी व चौकशी करण्यास सुरुवात केली होती. नागपूरमध्ये कोणत्या व्यक्तीकडून मोठा व्यवहार होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार, नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे. तसेच दुचाकी स्वाराला देखील अटक केले आहे. आरोपी साकीर खान हाजी नसीर खान हा बिन्नी नावाच्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो आहे.