गुरुवारी पहाटे ४ वाजता मानकापूर ठाण्याचे बीट मार्शल परिसरात गस्त घालत होते. फरस चौकाजवळील नुपूर वाईन शॉपजवळ पोलिसांनी एचआर-२९/एझेड-४१६६ क्रमांकाची कार उभी दिसली. बीट मार्शल जवळ जाताच कारमधील तरुणाने उतरून पळ काढला. पोलिसांनी इतर तिघांची विचारपूस केली असता ते तेथे उपस्थित राहण्याचे कारण सांगू शकले नाही. माहिती मिळताच वपोनि हरीश काळसेकर, पोउपनि रोहन पाटील, बजरंग खोमणे, पोहवा कृष्णा टेकाम, विजय बोंडे, राकेश खोब्रागडे, अनूप यादव, प्रवीण भोयर, विजय यादव, रोशन बागडे आणि हेमराज घटनास्थळी पोहोचले. कारची झडती घेतली असता स्टेपनीच्या खाच्यात आरोपींनी टीनाची शीट वेल्डिंग केली होती. पोलिसांनी पंचासमोर छेनी आणि हातोडीने टिनाची शीट काढली असता १५ प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये २९ किलो १०० ग्रॅम गांजा मिळाला.
पोलिसांनी फरार आरोपी जतीन याचाही शोध सुरू केला. तो गोरेवाडा रिंग रोडवर पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी आरोपींकडून गांजा, ३ मोबाईल फोन आणि वाहनासह १२ लाख रुपयांचा मालम जप्त केला. शहरातील एका गांजा विक्रेत्याने त्यांना माल घेऊन नागपूरला बोलावले होते, मात्रा त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी तस्करांना पकडले. स्थानिक गांजा विक्रेत्याबाबत चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक घटना! जंगलात एकाच दोरीने तरुण-तरुणीने झाडाला घेतला गळफास