
crime (फोटो सौजन्य: social media)
विजयच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहून रुग्णालय व्यवस्थापनाला दया आली, परंतु विद्यार्थ्यांना मानवी मूल्ये शिकवणारा प्राध्यापक नितीन देवतळे याने मदत तर सोडा फोन करण्याचीही तसदी घेतली नाही. विजयच्या मृत्यूसाठी पोलिसांनी नितीन आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विजयच्या कुटुंबियांनी केली आहे. नितीन आणि त्याचा भाऊ प्रवीण यांचे गुमगाव येथे राहणारा काका नाना देवतळे याच्याशी भांडण होते. २४ डिसेंबर रोजी संतापलेल्या नाना देवतळे याने त्याचे पुतणे प्रवीण आणि नितीनवर गोळीबार केला. १२ बोअरच्या बंदुकीतून निघालेली एक गोळी विजयला लागली. नितीनने बोलावल्यामुळेच विजय त्याच्या घरी काम करण्यासाठी गेला होता. पण ते त्याच्या जिवावर बेतले.
रुग्णालयानेही माफ केली मोठी रक्कम
सोमवारी संध्याकाळी विजयवर आणखी एक शस्त्रक्रिया झाली, परंतु मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले. रुग्णालयाचे मोठे बिल थकले होते. कुटुंबीयांनी पुन्हा नातेवाईकांकडून पैसे उसणे घेतले, रुग्णालयानेही मोठी रक्कम माफ केली. विजयचे नातेवाईक निखिल यांनी सांगितले की, केवळ समाजच नाही तर ओळखीचे लोकही विजयला मदत करण्यासाठी पुढे आले, परंतु देवतळे कुटुबाने मदत तर सोडाच, सांत्वन करण्यासाठी फोनही केला नाही. अटक टाळण्यासाठी नितीन देवतळे उपचाराचा देखावा करीत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, त्याच्यावर आधीच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. विजयवर गोळी झाडणारा नाना याला तर शिक्षा झाली पाहिजे, परंतु विजयव्या मृत्यूसाठी नितीनही जबाबदार आहे. त्यामुळे त्याच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजयच्या कुटुंबियांनी केली.
Mumbai Crime: 45 वर्षीय सिक्योरिटी गार्डने घरातच स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन; कांदिवली येथील घटना
Ans: काका-पुतण्यांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विजयला गोळी लागली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
Ans: गोळीबार करणारा काका नाना देवतळे असून नितीन व प्रवीण देवतळेंवरही जबाबदारी ठरवण्याची मागणी आहे.
Ans: विजयच्या मृत्यूसाठी जबाबदार सर्वांवर, विशेषतः नितीन देवतळे यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे.