Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

नागपूरच्या जरीपटका भागात घरविक्रीच्या वादातून शेजाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी मंगेश भिमटे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. हल्लेखोर फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 01:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घराच्या विक्रीवरून सुरू असलेला वादाचा रूपांतर हत्येत
  • मृताला वाचवताना वडील व पत्नी जखमी
  • आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, फरार
नागपूर: नागपूर परिसरातील घराच्या विक्रीवरून सुरू असलेल्या वादात गुन्हेगाराने शेजारी मंगेश भीमराव भिमटे (४२) रा. नजुल ले-आऊट, लुंबिनीनगर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. रुग्णालयात उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला. मृताला वाचविण्याच्या प्रयत्नात नातेवाईकही जखमी झाले. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता जरीपटक्याच्या लुम्बिनीनगरात घडली. पोलिसांनी मंगेश यांचा मुलगा अक्षितच्या तक्रारीवरून कुणाल ऊर्फ गोलू विद्याधर कांबळे (४५) विरुद्ध गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे.

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

प्राप्त माहितीनुसार, मंगेशच्या घराजवळच रमेश गेडाम यांचे घर होते. या घरावरून रमेशचा त्यांच्याच भावाशी वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गोलूने घरासाठी ग्राहक आणला होता. रमेशच्या भावाने गोलूसोबत मिळून ते घर विकले. रमेश यांनी बनावट कागदपत्रांद्वारे घर विकल्यामुळे न्यायालयात खटला दाखल केला. मंगेश या कामात रमेश यांना मदत करीत होते. यामुळे गोलू आणि मंगेश यांच्यात वैर निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता अक्षित घराच्या छतावर फिरत होता. दरम्यान, वडील मंगेश काम आटोपून घरी येताना दिसले. घराजवळच गोलूने त्यांचा रस्ता अडवला. कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. आरडा-ओरड झाल्याने मंगेशचे वडील भीमराव आणि पत्नी अमृता मदतीसाठी धावले. अमृताने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता गोलूने त्यांच्या गळ्याला कोयता लावला. वडील भीमराव यांनी काठी मारून सुनेला वाचवले. या दरम्यान गोलूने भीमराव यांच्या हातावर वार करून जखमी केले.

धमकावून झाला पसार

परिसरातील नागरिक गोळा झाले. गोलूने त्यांना धमकावले आणि घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी मंगेश यांना उपचारार्थ मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भीमराव यांना उपचारानंतर सुटी दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून गोलूचा शोध सुरू केला आहे. गोलूविरुद्ध घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत. घराच्या वादातून त्याने अनेकदा मंगेश यांना मारण्याची धमकी दिली होती.

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: घराच्या विक्रीतून निर्माण झालेल्या वैरातून.

  • Que: हल्ला कसा झाला?

    Ans: कोयत्याने वार करून मंगेश यांना गंभीर जखमी करण्यात आले.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: कुणाल उर्फ गोलू कांबळे (४५), गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला.

Web Title: Nagpur crime a man was fatally attacked with a machete by his neighbor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
2

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
3

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.