complaint to Election Commission against pm Modi for statement on changing the constitution
नवी दिल्ली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी राहिल्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. पक्षातील दिल्लीतील नेते महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन प्रचारसभा घेत आहेत. राहुल गांधी हे प्रचारामध्ये संविधानाची प्रत दाखवत आहेत. तर भाजप नेत्यांकडून कटेंगे तो बटेंगे सारख्या घोषणा दिल्या जात आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदल व संविधान वाचवणे यावरुन राजकारण रंगताना दिसले. भाजपाच्या काही नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केल्यामुळे आता हे त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप नेत्यांकडूनच संविधान बदलण्याचे वक्तव्य करण्यात आले होते. संविधानात दुरुस्ती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला दोन तृतियांश बहुमत द्या, असे आवाहन भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशाचे राजकारण बदलून निवडणूक संविधानावर केंद्रीत झाली. याचा फटका देखील भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये बसला. मात्र आता देशाचे संविधान बदलण्याची भाषा केल्यामुळे भाजप नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप पक्षश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
कॉंग्रेस प्रियांका गांधी शिर्डी प्रचार सभा
लोकसभा निवडणुकीमध्ये अब की बार 400 पारचा घोषणा भाजपकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा संदर्भ संविधान बदलण्याशी लावून भाजप नेत्यांच्या वक्तव्याने रान उठले. संविधान बदलण्याची भाषा व वक्तव्य केल्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांविरोधात आवाज उठवला आहे. संविधान “संपवण्याच्या” प्रयत्नांना भाजप पक्षश्रेष्ठी स्पष्टपणे पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला असून भाजप नेत्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय! शरद पवार यांचे महायुतीवर ताशेरे ओढणारे खुलं पत्र
याबाबत मत व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदेश सिंगलकर यांनी मत व्यक्त केले आहे. सिंगलकर म्हणाले की, “वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे काही खासदार, उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी संविधान बदलण्यासाठी पक्षाला लोकसभेच्या 400 जागा जिंकायच्या आहेत, असे जाहीर वक्तव्य केले होते. भारताच्या राज्यघटनेच्या अस्तित्वाला हा थेट धोका आहे. पण भाजपच्या सर्वोच्च नेतृत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही आणि विधाने परत घेतली नाहीत. मोदी, शहा आणि नड्डा हे असंविधानिक विचारांचे समर्थक असल्याचे यावरून दिसून येते,” असा घणाघात कॉंग्रेस नेते संदेश सिंगलकर यांनी केला आहे.