Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी; मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त

मतमोजणी कक्षात मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2024 | 10:55 AM
पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी; मतमोजणीसाठी 215 कर्मचारी

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी; मतमोजणीसाठी 215 कर्मचारी

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी सुमारे 215 अधिकारी, कर्मचारी तर सुरक्षेसाठी 137 पोलीस अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

हेदेखील वाचा : उमरखेडच्या ब्राम्हणगावातील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 59 हजार 744 मतदारांनी मतदान केलेले असून, मतदारसंघाची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम, रेल्वे मैदान समोर, कराड रोड पंढरपूर येथे होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबलची संख्या आहे. तर 25 फेऱ्यांतून मतमोजणी पूर्ण होणार आहे. एका टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक, एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक राहणार आहे.

तसेच मतमोजणी कक्षात मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीकक्षात पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप, सीसीटीव्ही यंत्रणा आदी सुविधा असणार आहे. संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह आग प्रतिबंधक सुविधा, स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहेत.

मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या अधिकृत पासधारकांसह मतमोजणीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच मोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्षात मोबाईल तसेच आक्षेपार्ह वस्तू नेता येणार नाहीत. तसेच स्वतंत्र माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. सुरक्षा व गोपनियतेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणीच्या वेळी राजकीय कार्यकर्ते, मतमोजणी प्रतिनिधी यांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

मतमोजणी कक्षात सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये 12 पोलीस अधिकारी, 125 पोलीस अंमलदार याशिवाय केंद्रीय सुरक्षा बल, एसआरपीएफ यांची सुरक्षा राहणार आहे. मतमोजणी केंद्रासह मतमोजणी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी केले आहे.

हेदेखील वाचा : गोंदियात झाले 69.74 टक्के मतदान; तरीही तब्बल 3 लाख 40 हजार मतदारांची मतदानाला दांडी

Web Title: Counting of votes at 14 tables for pandharpur assembly election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत
1

उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार आज ठरणार? भाजपच्या संसदीय मंडळाची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक; ‘ही’ नावं अधिक चर्चेत

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने
2

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
3

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

शक्तीपीठ मुद्दा पुन्हा पेटणार? शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
4

शक्तीपीठ मुद्दा पुन्हा पेटणार? शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.