Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात बॅग्स तपासणीचा मुद्दा तापला; कराड विमानतळावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची तपासणी

महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या बैठकीचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 15, 2024 | 06:18 AM
राज्यात बॅग्स तपासणीचा मुद्दा तापला; कराड विमानतळावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची तपासणी
Follow Us
Close
Follow Us:

कराड: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.दरम्यान महायुतीच्या उमेदवारासाठी आलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बॅगेची देखील तपासणी करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बॅग तपासणीवरून राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे. वणी,औसा आणि गोवा-महाराष्ट्र बॉर्डरवर उद्धव ठाकरेंच्या बॅग्सची तपासणी करण्यात आली. त्यावरून ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. मात्र त्यानंतर अनेक नेत्यांच्या बॅग्स तपासल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यानंतर याबाबत चांगलाच वादंग झाला होता. उद्धव ठाकरे यांनीही याबाबत तपास यंत्रणा, तसेच विरोधकांवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, कराड विमानतळावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही बॅग तपासण्यात आली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री, तसेच वरिष्ठ नेत्यांच्या बॅग तपासणीवरून चांगलेच आरोप, प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

हेही वाचा: Uddhav Thackeray : यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची झडती; निवडणूक अधिकाऱ्यांवर ठाकरे कडाडले, Video ही काढला

याबाबतची माहिती अशी की, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील  महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे  बुधवारी कराड दौऱ्यावर आले होते.  ते गुरुवारी गोव्याकडे रवाना होण्यापूर्वी कराड येथील विमानतळ परिसरात निवडणुक यंत्रणेकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

महायुतीने केलंय काम भारी, आता पुढची तयारी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक साठी कराड दक्षिण आणि कराड उत्तर चे भाजप महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्री मनोज घोरपडे आणि @Dr_Atul_Bhosale यांच्या प्रचारासाठी कराड येथे डॉक्टर आणि समाजातील इतर घटकांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी… pic.twitter.com/4TSReCzPZl

— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) November 13, 2024

राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे प्रचाराच्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशात दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना बॅग तपासण्यात आली होती. त्यावरून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी टीका केली.

हेही वाचा: काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच…! फडणवीस अन् गडकरींची बॅग चेकिंग; विरोधकांना सुनावले खडेबोल

दरम्यान, महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत डॉक्टरांच्या बैठकीचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर गुरुवारी गोव्याला परतताना कराड विमानतळ परिसरात निवडणुक यंत्रणेकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. यामुळे राज्यातील माजी मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ नेत्यांसह बाहेर राज्यातून येणाऱ्या स्टार प्रचाराकांच्याही बॅगांची तपासणी होत असल्याने हा मुद्दा चांगला चर्चेत आला आहे. राज्यात २० तारखेला २८८ जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तर २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील जनता यंदा महायुती की महाविकास आघाडीला साथ देणार हे पहावे लागणार आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक असणार आहे. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने असणार टे २३ तारखेलाच कळणार आहे.

Web Title: Election comission officers check the bags of goa cm dr pramod sawant at karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Election Comission
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय
1

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले ‘हे’ आदेश
2

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले ‘हे’ आदेश

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
3

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.