'या' दोन नेतेमंडळींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बळ वाढणार
बारामती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघा एक आठवडा बाकी राहिला आहे. पक्षाचे दिल्लीचे नेते राज्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत. पण सध्याचे राजकारण हे बॅग तपासणीवर फिरते आहे. निवडणूक आयोगाकडून प्रचारावेळी होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी बॅगांची तपासणी केली जात आहे. यामध्ये राजकीय नेते देखील अपवाद नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या बॅगची चेकिंग झाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावरुन राज्याचे राजकारण रंगलेले असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील बॅगची तपासणी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांची वणी व औसा या मतदारसंघामध्ये हेलिपॅडवरच बॅग चेकिंग करण्यात आली. यावरुन त्यांनी जोरदार शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधकांची तपासणी करण्याचा निवडणूक आयोगाचा डाव असल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची यापूर्वीच नागपूरमध्ये बॅगाची तपासणी झाली असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बॅगची देखील लातूरमध्ये तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये बॅग तपासणीवरुन वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगची बारामतीमध्ये तपासणी करण्यात आली.
बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. पवार कुटुंबामध्येच ही लढत होणार आहे. अजित पवार हे स्वतः बारामतीचे उमेदवार आहेत. त्यांची बारामतीमध्ये चेकिंग करण्यात आली. बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तापासणी केली. यावेळी अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. अजित पवारांनी फोनवर बोलत असताना त्यांनी स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी अजित पवारांच्या एका बॅगेमध्ये चक्क दिवाळीचा फराळ असल्याचे दिसून आले. अजित पवार यांच्या एका बॅगमध्ये चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा…सगळ्या बॅगा तपास…त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर…असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले. त्यामुळे एकच हशा पिकला.
Today, while on my way for election campaigning, the Election Commission conducted a routine check of my bags and helicopter. I fully cooperated and believe that such measures are essential to ensure free and fair elections. Let us all respect the law and support efforts to… pic.twitter.com/lVDUPh174u
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 13, 2024
भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरुन देवेंद्र फडणवीस यांच्या तपासणीची व्हिडिओ शेअर करण्यात आली. कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, “जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली. (हा तो 5 नोव्हेंबरचा व्हिडिओ) दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे.” असा टोला भाजपने विरोधकांना लगावला आहे.