Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024: राज्यात मतदान सुरूच होताच अनेक ठीकाणी EVM पडले बंद, केंद्राबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मात्र मतदान सुरुच होताच काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद आहेत. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 20, 2024 | 10:54 AM
कोल्हापूर जिल्ह्यात पराभूतांना सर्वाधिक पोस्टल मतदान

कोल्हापूर जिल्ह्यात पराभूतांना सर्वाधिक पोस्टल मतदान

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 in Marathi : विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.अशातच अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पण काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झाल्यामुळे नागरिकांच्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहे. परिणामी मतदारांना त्रास सहन करावा लागत आहे.

या भागात ईव्हीएम मशीन बंद

अकोला – अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात बी. आर हायस्कूल मध्याळा येथील बूथ क्रमांक १६९ मधील ईव्हीएम मशीन बंद आहे. सकाळी मतदान सुरू झाल्यापासून मतदान यंत्रात बिघाड झाला आहे.या मतदान केंद्रावर अद्याप मतदान सुरू झालेले नाही. मतदान केंद्रावर मतदार ताटकळत उभे आहेत. दरम्यान, अकोल्यात विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली.

संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील २२६ केंद्रावरील ईव्हीएम मशिन गेल्या तासाभरापासून डाऊन आहेत. प्रशासनाकडून मशिन बदलण्याचे काम सुरू आहे. मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी रांग लागली आहे. मतदानाचा वेळ लागत असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे.

Maharashtra Assembly Election Voting Live 2024 : युगेंद्र पवार यांनी बारामतीत केले मतदान, शरद पवार आमच्यासोबत…

कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पुणे – पुण्यतील कोथरूड मतदारसंघातील ईव्हीएम मशीन बंद आहेत. अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम गेल्या तासाभरापासून बंद आहे. तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई – शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आरएम भट शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद आहे. ईव्हीएम क्रमांक ४१ मशीन बंद आहे. तर प्रबोधनकार ठाकरे उद्यानात असलेल्या मतदान केंद्रावर अपूर्ण वीजपुरवठ्यामुळे ईव्हीएम मशीन सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

मालेगाव – मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 292 येथील ईव्हीएम मशीन बंद आहेत.या बूथवर असलेली ईव्हीएम मशीन अवैध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मालेगावातील अनेक मतदार चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. केवळ ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

नाशिक- दुसरीकडे, नाशिकमधील पंचवटी संकुलातील सोनूबाई केला मतदान केंद्रावरील 189 बूथ तांत्रिकदृष्ट्या खराब झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे नाशिकमध्ये मतदानाला 20 मिनिटे उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदानासाठी प्रवेशद्वार उघडण्यात आले आहे.

जळगाव- जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरू न झाल्याने मोठा गोंधळ उडाला. ईव्हीएम मशीन सुरू होण्यास उशीर झाल्याने मतदान केंद्रावर 15 ते 20 मिनिटे उशीर झाला. ईव्हीएम मशीन सुरू करण्यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर, 15 ते 20 मिनिटे मशीन सुरू करा आणि नंतर ते सील करा. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. हे ईव्हीएम मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक आणि महिला बाहेर थांबून होते.

Jharkhand Assembly Election Voting Live 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु; भाजप समोर तगडे आव्हान

Web Title: Maharashtra assembly election 2024 evm were shut down in many places as voting continued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!
1

ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची ‘भरारी’; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
2

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचं निधन; 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

US-Israel Iran War: उरणचे दाम्पत्य अ‍ॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद
4

US-Israel Iran War: उरणचे दाम्पत्य अ‍ॅनिव्हर्सरीला गेले अन् दुबईत अडकले, युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.