Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! रवी राजा भाजपमध्ये जाणार

सायनमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नाराज नेते रवी राजा हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय त्यांनी आपला राजीनामा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केल्याचीही माहिती आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2024 | 11:40 AM
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! रवी राजा भाजपमध्ये जाणार (फोटो सौजन्य-X)

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का! रवी राजा भाजपमध्ये जाणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Ravi Raja resigns:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसचा ‘हात’सोडला. आता ते भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.ते काँग्रेसचा मुंबईतील चेहरा मानले जातात. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केला.

फडणवीस यांची घेतली भेट

काँग्रेसमध्ये मेरिटनुसार तिकीट मिळत नसल्याचा आरोप करत रवी राजा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सायन विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. केवळ तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. याचदरम्यान आज (31 ऑक्टोबर) सकाळीच ते भाजपच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

भाजपचे आणखी एक विरोधी पक्षनेते

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद भूषवलेल्या मधुकरराव पिचड, नारायण राणे यांच्यापासून एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षांतर केल्याच्या परंपरेत आता माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांची भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा: सोलापुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईपर्यंत हलवली सूत्र; उमेदवार महादेव कोगनुरे यांचा अर्ज मंजूर

मुंबई महापालिकेचे पाचवेळा नगरसेवक असलेले रवी राजा यांना सायन-कोळीवाडा मतदारसंघातून काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवायची होती. पण, त्यांच्या या डावाला राज्यातील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळाला असता, मात्र हायकमांडने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. 44 वर्षीय सेवेचा सन्मान न केल्याची केली खंत त्यांनी व्यक्त केली. आता देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत ते भाजप प्रवेश करत आहेत.

काँग्रेसच्या फटका बसण्याची चिन्हं

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन यांचा 14 हजार मतांच्या फरकाने पराभव झाल्यानंतर काँग्रेसने गणेश यादव यांना तिकीट दिले आहे. रवी राजा सायन-कोळीवाड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पक्षाचा, विशेषतः तमिळ आणि मराठी मतदारांचा पाठिंबा कमी होईल. सत्ताविरोधी लढा देत असलेल्या कॅप्टन तमिलसेल्वन यांना भाजपमध्ये प्रवेश केल्याने बळ मिळणार आहे.

मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक

भाजपची पत्रकार परिषद साडेअकरा वाजता आहे. पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्त्वाची आहे. भाजपकडून नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारीवरून नाराजी आहे, यावर चर्चा होईल. सोबतच सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरी याबाबत देखील चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा: धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली…; अमित ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत

Web Title: Maharashtra assembly elections 2024 congress leader ravi raja joins bjp weakens partys sion koliwada base

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly Elections 2024

संबंधित बातम्या

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा
1

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; आरपीआयच्या आठवले गटाचा इशारा

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’
2

RSS-BJP Dispute: भाजप-आरएसएसमध्ये मतभेद? राम माधव यांनी सांगितली ‘अंदर की बात’

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
3

भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा
4

Bacchu Kadu News:माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.