Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…

कॉँग्रेस हायकमांडने संधी दिल्यास मी आणखी दोन अर्थसंकल्प सादर करू शकतो असे सिद्धरामय्या म्हणाले होते. शुक्रवारी त्यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून 17 वा अर्थसंकल्प सादर केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 09, 2026 | 06:57 PM
Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…
Follow Us
Follow Us:

कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता 
डिके शिवकुमार आणि मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना
अधिवेशनानंतर डिके शिवकुमार मुख्यमंत्री होण्याची शक्यता

Karnataka Congress: कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्ता बदलली जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे. कर्नाटकमध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच कॉँग्रेस पक्ष आपली सत्ता गमावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉँग्रेसचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार हे दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना डिके शिवकुमार यांनी मुख्यमंत्री बदलला जाणार का या चर्चेला उधाण आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर राज्यात नेतृत्व बदलले जाण्याची शक्यता आहे. सिद्धरामय्या यांच्या ऐवजी डिके शिवकुमार हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. डिके शिवकुमार कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत कलबुर्गीवरून दिल्लीला रवाना झाले. समोर आलेल्या माहितीनुसार डिके शिवकुमार आपल्या खासगी कार्यक्रमानिमित दिल्लीला गेले आहेत. मात्र त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून डिके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहायला दिसून येत आहे. कॉँग्रेस हायकमांडने संधी दिल्यास मी आणखी दोन अर्थसंकल्प सादर करू शकतो असे सिद्धरामय्या म्हणाले होते. शुक्रवारी त्यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून 17 वा अर्थसंकल्प सादर केला. डिके शिवकुमार यांना पाठिंबा देणाऱ्या काही आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर आमच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे.

राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?

डिके शिवकुमार काय म्हणाले?

मुख्यमंत्रीपदाबाबत डिके शिवकुमार यांनी विधान केले आहे. आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलेले नाही. आमच्यामध्ये असलेल्या गोष्टी मी, मुख्यमंत्री आणि हायकमांडपुरते मर्यादित आहेत. जो काही निर्णय घेतला गेला आहे त्यात आमचा सहभाग आहे. यापलीकडे मी कधीही काहीही बोललो नाही, असे डिके शिवकुमार म्हणाले.

मोठी बातमी! ‘या’ राज्यात भाजपचे ऑपरेशन Lotus? काँग्रेससाठी 48 तास महत्वाचे; खरगे म्हणाले…

दरम्यान कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहे. मात्र सर्वांच्या नजरा या भाजपकडे खिळल्या आहेत. कॉँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादाचा फायदा भाजप उठवणार का?  अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. नाराज नेत्याला आणि त्याच्यासोबत येणाऱ्या आमदारांना सोबत घेऊन भाजप काही नवीन खेळी करणार का हे पहावे लागणार आहे.

Web Title: Dk shivkumar become a cm as karnataka siddaramaiah post indian politics bjp operation lotus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • dk shivkumar
  • Karnataka

संबंधित बातम्या

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
1

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
2

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
3

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
4

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.