Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC News : ‘स्वीकृत’साठी इच्छुकांची जोरदार फिल्डींग; 10 जागांसाठी तब्बल ‘इतके’ जण रांगेत

पुणे महापालिका निवडणुकीत १६५ पैकी ११९ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय वर्तुळात चुरस वाढली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 11:47 AM
'स्वीकृत'साठी इच्छुकांची जोरदार फिल्डींग; 10 जागांसाठी तब्बल 'इतके' जण रांगेत

'स्वीकृत'साठी इच्छुकांची जोरदार फिल्डींग; 10 जागांसाठी तब्बल 'इतके' जण रांगेत

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत १६५ पैकी ११९ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांसाठी राजकीय वर्तुळात चुरस वाढली आहे. यापूर्वी पाच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जात होती; मात्र राज्य सरकारने कायद्यात बदल करून ही संख्या दुप्पट करत १० केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत तसेच बाहेरील अनेक इच्छुकांनी या पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

 

निवडणुकीच्या निकालानुसार भाजपला ७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २ आणि काँग्रेसला १ असे एकूण दहा स्वीकृत नगरसेवक पदे मिळणार आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे शिफारस करण्याबाबत पत्र दिले आहे. ही नावे ९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयुक्तांकडे सादर करावी लागणार असून, मार्च महिन्यात होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. काहींना एबी फॉर्म देऊनही शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेण्यात आली, तर काहींची उमेदवारी स्थानिक राजकीय समीकरणांमुळे रद्द झाली. काही ठिकाणी बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही.

या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष नेत्यांकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. स्वीकृत सदस्यपद मिळाल्यास नगरसेवक म्हणून ओळख मिळते. तसेच महापालिकेच्या अर्थसंकल्पातून काही निधी विकास कामांसाठी मिळतो. त्यामुळे अनेक इच्छुकांनी थेट वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून या पदासाठी लॉबिंग सुरू केली आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे.

नियमांनुसार स्वीकृत नगरसेवक पदे डॉक्टर, अभियंते, वकील, तज्ज्ञ किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात बहुतेक वेळा राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाच या पदांवर संधी मिळते. त्यामुळे या पदांसाठी पक्षांतर्गत समीकरणे आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, ९ मार्च रोजी नावे सादर झाल्यानंतर मार्च महिन्यातील सर्वसाधारण सभेत या नियुक्त्यांना अंतिम स्वरूप मिळणार आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने स्वीकृत नगरसेवक पदांनाही विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा : वाहतूक कोंडी कमी होणार! विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

काँग्रेसच्या एका जागेसाठी ६८ इच्छुक

पुणे महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने राज्य पातळीवरील नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असून, अंतिम निर्णयासाठी अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात येणार आहे. या एका जागेसाठी तब्बल ६८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख दावेदारांमध्ये माजी आमदार रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे, माजी नगरसेविका लता राजगुरू, काँग्रेसचे राज्य प्रवक्ते व माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा नीता रजपूत, माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड, तसेच माजी नगरसेवक अजित दरेकर, सुनील मलके आणि कैलास गायकवाड यांचा समावेश आहे.

Web Title: The number of aspirants for the post of approved corporator in pune municipal corporation has increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • BJP
  • NCP News
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pratap Sirnaik: नवीन ऑटो रिक्षांना परवाने नाहीत? प्रताप सरनाईकांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
1

Pratap Sirnaik: नवीन ऑटो रिक्षांना परवाने नाहीत? प्रताप सरनाईकांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…
2

Indian Politics: काँग्रेस सत्ता गमावणार? ‘या’ राज्यात ऑपरेशन Lotus? मुख्यमंत्री बदलणार अन्…

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात
3

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात

“… ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत”; ‘संभाजी’ कादंबरीबाबत विश्वास पाटलांची कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी
4

“… ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत”; ‘संभाजी’ कादंबरीबाबत विश्वास पाटलांची कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.