Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप

आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 05:01 PM
शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे...; काँग्रेसचा आरोप

शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे...; काँग्रेसचा आरोप

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात एल्गार पुकारला असून, आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. सकाळी माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून, नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, मागासवर्गीय समाजाचा आक्रोश पोहचवण्यासाठी शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वर्धा ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा कोणाच्याही फायद्यासाठी नसून गडचिरोलीतील खनिज विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून समुद्रकिनाऱ्यापर्यंत वाहतूक सुलभ करता यावी यासाठी हा महामार्ग केला जात आहे. हा महामार्ग पुंजीपतींसाठी टाकलेले रेड कार्पेट आहे. या महामार्गाचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही व सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. कंत्राटदारांची बिले थकली आहेत, पगार करायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासही सरकारकडे पैसे नाहीत, अशा परिस्थितीत सरकारच्या लाडक्या पुंजीपतीसाठी ८८ हजार कोटी रुपयांचा शक्तीपीठ महामार्ग बनवला जात आहे, हे दिवाळखोरीचे लक्षण आहे. राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सरकार भ्रष्टाचाऱ्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर

अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नये – सपकाळ

आखाती युद्धामुळे एलपीजी गॅस महाग झाल्याच्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल वा गॅसच्या किमती कमी झाल्या तर त्य़ाचा फायदा सरकार ग्राहकांना देत नाही मात्र तुटवडा निर्माण झाला की कांगावा करत पूंजीपतीसाठी भाव वाढ करते, त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होतो. युद्धामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडे काही नियोजन नाही, आंतरराष्ट्रीय निती, धोरण नाही. केंद्र सरकारने डोळे उघडून बघावे, संसदेत चर्चा करावी, विरोधी पक्षांशी बोलावे. अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नये, ताठ मानेने उभे रहावे, सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहिल, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. कळमनुरी ते हिंगोली शेतकरी संघर्ष पदयात्रेचा समारोप जाहीर सभेने झाला.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the modi government over farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Anna Hazare Statement: ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”
1

Anna Hazare Statement: ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”

AAP’s Raghav Chadha Joins BJP: केजरीवालांना मोठा झटका! राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील; पाहा फोटो
2

AAP’s Raghav Chadha Joins BJP: केजरीवालांना मोठा झटका! राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील; पाहा फोटो

Arvind Kejriwal : ‘भाजपने पुन्हा एकदा…’, 7 खासदार फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया
3

Arvind Kejriwal : ‘भाजपने पुन्हा एकदा…’, 7 खासदार फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

आमदार गायकवाडांचे विधान गुन्हेगारी स्वरुपाचे, फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान
4

आमदार गायकवाडांचे विधान गुन्हेगारी स्वरुपाचे, फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.