Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात

पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका ९ मार्च रोजी पार पडल्या असून, १३ पैकी तब्बल १० पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला झेंडा फडकावला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 06:36 PM
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुन्हा सुरु झाल्या चर्चा; सुनेत्रा पवार राजी, पण प्रफुल्ल पटेल अन् तटकरे...

NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुन्हा सुरु झाल्या चर्चा; सुनेत्रा पवार राजी, पण प्रफुल्ल पटेल अन् तटकरे...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका ९ मार्च रोजी पार पडल्या असून, १३ पैकी तब्बल १० पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला झेंडा फडकावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. जुन्नर, खेड आणि दौंड हे तालुके वगळता उर्वरित सर्व पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता स्थापन झाली आहे. जुन्नरमध्ये शिवसेना (शिंदे गट), खेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर दौंडमध्ये भाजपची सत्ता आली आहे.

 

दरम्यान, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही तालुक्यांमध्ये राजकीय घडामोडीही लक्षवेधी ठरल्या. मुळशी तालुक्यात संग्राम थोपटे यांनी ‘नवीन मुळशी पॅटर्न’ पाहायला मिळेल, असे वक्तव्य केले होते. मात्र त्याला शह देत आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि भाजपचे चार सदस्य निवडून आले होते. सभापती निवड चिठ्ठी पद्धतीने झाली असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने चिठ्ठी निघाल्याने पंचायत समिती भोरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. भोर नगरपालिकेनंतर पंचायत समितीवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून, यामुळे संग्राम थोपटे यांना राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. तसेच पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता स्थापन झाली असली तरी सुरुवातीला भाजपसोबत युतीची चर्चा होती. मात्र ऐनवेळी शिवसेनेचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार विजय शिवतारे यांनी माजी आमदार संजय जगताप यांना राजकीय शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जुन्नर पंचायत समितीच्या सभापतीपदी कमल बाळू शेळकंदे (भिवाडे खुर्द) यांची निवड झाली असून, त्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या आहेत. उपसभापतीपदी अमित अनंता ढोले (येणेरे) यांची निवड झाली असून ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आहेत. आंबेगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी कैलास (बुवा) भिमाजी काळे (घोडेगाव) यांची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी ज्योती प्रविण पारधी (राजपूर) यांची निवड झाली.

शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी स्वाती विठ्ठल घावटे (घोटेमळा) तर उपसभापतीपदी रामराव बबन सासवडे (बंजरगांववाडी, शिक्रापूर) यांची निवड झाली. खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी विद्या सयाजी मोहिते (पिंपळगाव तर्फे खेड) तर उपसभापतीपदी मंगेश गुलाब सावंत (शिरोली) यांची निवड झाली असून दोघेही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आहेत. मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनिता मनोहर येवले (पाचाणे) आणि उपसभापतीपदी साहेबराव नारायण कारके (उर्स) यांची निवड झाली आहे. दौंड पंचायत समितीच्या सभापतीपदी सुखदेव सोनबा चोरमले (तांबेवाडी) तर उपसभापतीपदी अमृता अभिमन्यु गिरमकर (देऊळगाव राजे) यांची निवड झाली असून दोघेही भाजपचे आहेत.

बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे (सांगवी) तर उपसभापतीपदी शुभांगी सुनील आगवणे (गुनवडी) यांची निवड झाली आहे. पुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी अमित भाऊसाहेब झेंडे (दिवे) तर उपसभापतीपदी प्रविण बाळासाहेब जगताप (मांडकी) यांची निवड झाली आहे. इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन मधुकर लोढे (लासुर्ण) आणि उपसभापतीपदी जयकुमार गोपाळ कारंडे (कारंडेवस्ती) यांची निवड झाली आहे. भोर पंचायत समितीच्या सभापतीपदी मनिषा संतोष कंक (म्हसर खुर्द) तर उपसभापतीपदी विशाल सुभाष कोडे (केळवडे) यांची निवड झाली आहे.

मुळशी पंचायत समितीच्या सभापतीपदी मंदा कृष्णराव उर्फ बाबाजी शेळके (पिंपोळोली) यांची निवड झाली असून, उपसभापतीपदी दगडू नामदेव करंजावणे (भुगाव) यांची निवड झाली आहे. वेल्हा पंचायत समितीच्या सभापतीपदी सुवर्णा किरण राऊत (आंत्रोली) तर उपसभापतीपदी संदीप लहु खुटवड (निगडे बु.) यांची निवड झाली आहे. हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदी युवराज हिरामन काकडे (थेऊर) आणि उपसभापतीपदी विद्या दत्तात्रय गायकवाड (वडकी) यांची निवड झाली.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांच्या नुकसानीला मोदी सरकारच जबाबदार, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्यामुळे…; काँग्रेसचा आरोप

Web Title: Ajit pawars ncp has come to power in many panchayat committees in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • BJP
  • NCP News
  • Panchayat Samiti Election

संबंधित बातम्या

Nagpur : हिमंता सरमा यांच्या मंत्राच्या मुलीचे बंड , मोदींविरोधात ओकले कटू शब्द
1

Nagpur : हिमंता सरमा यांच्या मंत्राच्या मुलीचे बंड , मोदींविरोधात ओकले कटू शब्द

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,
2

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान
3

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
4

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.