Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Elections 2024: “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलीकडे फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते या फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत. अशी टिका देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर केली. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 08, 2024 | 09:51 AM
“फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल (फोटो सौजन्य-X)

“फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर कडक शब्दांत टीका करत त्यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक” असे संबोधले.तसेच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला स्थलांतरित होत असल्याची खोटी माहिती पसरवून विरोधक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र हा गुंतवणुकीसाठी अजूनही पहिली पसंती आहे आणि संपूर्ण भारतातील ५२% विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केली आहे.

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक दृष्टिकोनातून मजबूत आहे आणि विरोधकांनी पसरवलेली माहिती फसवी आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्या सरकारने महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी एक आदर्श ठिकाण बनवले आहे.” त्यांच्या मते, राज्यातील औद्योगिक स्थान बदलत असल्याची बातमी खोटी असून ती फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहे. त्यामुळे आश्चर्य वाटते की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिराच करायची गरज नाही, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे सुद्धा वाचा: नालासोपारात बेहिशोबी साडेतीन कोटी रुपये हस्तगत

फडणवीसांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. त्यांनी सुळे यांना “फेक नॅरेटिव्ह फॅक्टरी” ची व्यवस्थापिका संबोधले आणि त्यांनी हिंजवडीमधील IT कंपन्या बाहेर गेल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला. तसेच राज्यातील औद्योगिक आणि IT क्षेत्र सशक्त आहे आणि कोणतेही आव्हान हे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आलेल्या अडचणींचा परिणाम आहे. सुळे यांचे विधान चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी याला महाराष्ट्राच्या प्रगतीस नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या ‘लडकी बहीण’ योजनेवरील टीकेचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, ठाकरे यांची योजना विरोध दर्शवणे हे सर्वसामान्य लोकांच्या गरजांशी विसंगत आहे. फडणवीसांनी स्पष्ट केले की, या योजनेतून हजारो मुलींना आर्थिक मदत मिळणार असून त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध होतील.

सभेच्या शेवटी फडणवीसांनी भाजप सरकारच्या रोजगार निर्मितीविषयी आश्वासन दिले. त्यांनी १० लाख युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आणि महाराष्ट्राच्या आर्थिक स्थैर्याचे पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करण्याचे वचन दिले. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, विरोधकांनी पसरवलेल्या “फेक नॅरेटिव्ह” पासून सावध राहावे आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर विश्वास ठेवावा. या सभेमध्ये फडणवीसांनी भाजपची पारदर्शकता आणि विकासाभिमुखता स्पष्ट करत विरोधकांची “फेक नॅरेटिव्ह” धोरण म्हणून प्रतिमा निर्माण केली.

हे सुद्धा वाचा: खेड तालुक्यातील लढत विकासाच्या मुद्द्यावर; ‘मोहिते पाटलांना निवडून द्या, त्यांना मंत्री करतो’; अजित पवारांचे आश्वासन

Web Title: Maharashtra elections 2024 devendra fadnavis refers to sharad pawar as owner of fake narrative factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 09:51 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
3

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
4

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.