Ramesh Chennith informed that the complete list of candidates will be announced today
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची खलबतं अगदी दिल्लीपर्यंत सुरु आहेत. निवडणुकीला अगदी काही काल शिल्लक असताना महाविकास आघाडीमध्ये मतभेद सुरु होते. मुख्यमंत्रिपदावरुन आणि राज्यातील काही जागांवर रस्सीखेच सुरु होती. आता अखेर महाविकास आघाडीमधील मतभेद समाप्त झाले असून उमेदवारांची नावं घोषित केले जात आहेत. आता कॉंग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यावर आता महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माध्यमांशी संवाद साधला असून आज (दि.26) सर्व उमेदवार जाहीर होतील, असे रमेश चेन्निथला यांनी सांगितले.
रमेश चेन्निथला यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर चेन्निथला म्हणाले की, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी-सपा प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन सर्व प्रश्न सोडवतील. महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असून सर्व उमेदवारांची आज घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत किंवा कोणती अडचणी देखील नाहीत. जे काही अडचण ती महायुतीमध्ये असेल. महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत आणि आम्ही एका सूत्रावर काम करत आहोत. महायुतीमध्ये मोठी अडचण आहे. आम्ही काही जागांची मागणी करत असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आम्हाला मिळालेल्या जागांवर आम्ही ओबीसींना (उमेदवार) न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,” असे मत त्यांनी मांडले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही पक्ष आज अंतिम यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक शुक्रवारी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झाली. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, “महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत, परंतु ते एमव्हीएद्वारे सोडवले जातील. महाराष्ट्राला जुने वैभव परत आणण्यासाठी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहे,” असा विश्वास कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली दुसरी यादी