अक्कलकोटमध्ये भाजप माजी राज्यमंत्रीसिध्दराम म्हेत्रे विरुद्ध सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये राजकीय झुंज (फोटो - टीम नवराष्ट्र)
अक्कलकोट : नंदकुमार जगदाळे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये प्रतिष्ठेची लढत दिसून येत आहे. अशीच कडवी झुंज अक्कलकोटमध्ये सुद्धा दिसून येत आहे. माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात अकलकोट विधानसभा मतदारसंघात कडवी झुंज लागली आहे . कल्याणशेट्टी यांची प्रतिष्ठा तर म्हेत्रे यांची अस्तित्वाची लढाई होणार आहे.
अकलकोट विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहिला आहे. काँग्रेसने सिध्दराम म्हेत्रे यांना उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे .सोलापूर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाबाबत विशेष योगदान देत असल्याने कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत.
2019 मधील विधानसभा निवडणुकीत प्रचार दौऱ्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी म्हेत्रे विरुद्ध कल्याणशेट्टी यांची लढाई बाहुबली विरुद्ध भाजपा तालुकाध्यक्ष सामान्य कार्यकर्ता अशी केशी केली होती . मात्र पहिल्यादांच विधानसभा निवडणूक लढवणारे कल्याणशेट्टी चार टर्म विधानसभा निवडणुकीचा अनुभव असलेल्या अत्यंत मुत्सदी राजकारणी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा ३८,000 पेक्षा अधिक मताने पराभव केला. महायुती सरकार एवढा मोठा निधी अक्कलकोट विकासासाठी कुठल्याच सरकारने दिला नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये बहुतांश सर्वच विकासकामे महायुती सरकारकडून मंजुर करून घेतल्याने विकास कामाच्या जोरावर आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी कॉग्रेस पुढे मोठे तगडे आव्हान निर्माण केले आहे. यामुळे प्रारंभी पासुनच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा विधानसभा मतदार संघात मजबुत पाया निर्माण केल्याने निवडणूकीच्या घोषणेपूर्वी आमदार कल्याणशेट्टींनी प्रचार सभांमध्ये बाजी मारली.
हे देखील वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
2024 विधानसभा निवडणुकीसाठी कॉग्रेसकडून आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना उमेदवारी घोषणाच विलंबाने झाली. माजी म्हेत्रे यांच्या पाठिशी तब्बल पाच विधानसभा निवडणुकीचा दांडगा अनुभव आहे. माजी गृह राज्य मंत्री तुरुंग फलोत्पादन अशी राज्य मंत्री पदाची जबाबदारी त्यांनी कॉग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात सांभाळली आहे. तालुक्याच्या राजकारणात दिवंगत नेते बाबासाहेब तानवडे यांच्या निधनामुळे झालेल्या पोट निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर सलग सर्वच सार्वत्रिक निवडणुकीत ते कॉग्रेस कडून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत . 2019 विधानसभा निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे विरुद्ध कल्याणशेट्टी पहिलीच लढत होती पहिल्याच लढती मध्ये कल्याणशेट्टी यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. आता 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली. मुस्लीम, मागसवर्गीय मराठा समाज, या निवडणुकीत काय भुमिका घेतात यावर बरेच गणित अवलंबून आहे. लिंगायत समाज मतदार संख्या सर्वाधिक आहे यामुळे लिंगायत समाज आपले वजन ज्या पारड्यात जास्त टाकेल त्या चे पारडे जड राहणार आहे . त्यामुळे २०२४ विधानसभा निवडणुकीत कुठला पक्ष आपले अस्तित्व दाखवतो याबद्दल मोठी उत्सुकता आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्हयाचे नव्हेतर राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.