Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित…; मनोज जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया

राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महायुती एकतर्फी पूर्ण बहुमत मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मात्र जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 25, 2024 | 03:52 PM
manoj jarange patil reaction on devendra fadnavis as cm of maharashtra

manoj jarange patil reaction on devendra fadnavis as cm of maharashtra

Follow Us
Follow Us:

जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. चुरशीची लढत होण्याची शक्यता असताना एकतर्फी निकाल लागला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यामध्ये मागील दीड वर्षापासून मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले आहे. ओबीसीमधून आरक्षण घेण्यासाठी जरांगे पाटील आक्रमक असून त्यांनी आरक्षणासाठी सत्ताधारी महायुतीचा फटशा पाडा म्हणून घोषणा दिली. प्रत्यक्षात मात्र महायुतीने विक्रमी विजय मिळवला आहे. यानंतर आता जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व म्हणून हवे आहेत. भाजपने राज्यामध्ये सर्वांत जास्त जागांवर विजय मिळाला असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा  झाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे, असे भाजप पक्षश्रेष्ठींचे मत आहे. यामुळे आता फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याच्यै मार्गावर आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आमची जात आणि आमचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्या आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्य़ाबाबत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. हे पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे. सत्ता, सत्ता असते. त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत. त्याचे आम्हाला काही वाटत नाही. सासु जरा खंदूशी असल्यासारखी आहे, आणि सासुला जनता बरोबर ठेप्यावर आणते, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

पुन्हा उगारणार उपोषणाचे हत्यार

मनोज जरांगे पाटील हे आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहेत. त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. जरांगे पाटील म्हणाले की,”आम्हाला आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा द्यायचा आहे. तो आम्ही करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे, आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले आहे. आता मोठा लढा उभा करायचा आहे.”

Web Title: Maratha leader manoj jarange patils reaction to devendra fadnavis becoming the chief minister of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 03:52 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार
2

‘मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही’; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
3

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
4

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.