आदित्य ठाकरे यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; भास्कर जाधव यांच्याकडे गटनेतेपद
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. महायुतीला पूर्ण बहुमत असल्यामुळे आज सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे करण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उध्यक्षतेखाली विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राजकारणासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीन नेत्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली ठाकरे यांची पक्षाचे विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे, भास्कर जाधव गटनेतेपदी यांनी , तर सुनील प्रभु यांची पुन्हा प्रतोदपदी नेमणूक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उध्यक्षतेखाली विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभेचे नवनिर्वाचीत सर्व सदस्य आणि लोकसभेचेही सदस्य उपस्थित होते.
शिवसेनेचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धठ ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे, त्यावर माध्यमांनी अंबादास दानवे यांना विचारलं असता, त्यांनी हा दावा फेटाळून लावला. एकनाथ शिंदे खोट बोलत आहेत. या आधीही ते असंत सांगत आले आहेत. मात्र आमचे सर्व आमदार आज विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला होते आणि यापुढेही राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.
निवडणूक निकालासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
उद्धव ठाकरे गटाचे केवळ २० आमदार आहेत. मात्र २० असले तरी काही कमी नाहीत. जनतेच्या प्रश्नासाठी विधानसभेत लढततील. जनतेच्या समस्या मांडतील, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.