Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM of Maharashtra : महाराष्ट्राचे सरकार बनणार तरी कधी? अजित पवार यांनी थेट सांगितली तारीख

विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून एकतर्फी महायुतीच्या बाजूने निकाल लागला आहे. मुख्यमंत्री पद व शपथविधीबाबत कधी होणार याबाबत वक्तव्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 28, 2024 | 01:59 PM
'या' नेतेमंडळींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बळ वाढणार; पक्षाला मिळाली नवसंजीवनी

'या' नेतेमंडळींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बळ वाढणार; पक्षाला मिळाली नवसंजीवनी

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. विधानसभेचा निकाल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला आहे. बहुमतापेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून देखील अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभेचा कार्यकाल संपला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आता त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा देखील सोडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार उलथापालथ होत आहे. यामध्ये राज्य सरकारचा शपथविधी सोहळा कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

महाराष्ट्राचे राजकारण जोरदार रंगले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्य मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच झाल्याचे दिसले. मात्र नंतर अजित पवार यांनी माघार घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली. तर एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तसेच समाधानी असल्याचे देखील शिंदे म्हणाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी तिन्ही नेते दिल्लीला गेले आहेत. त्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शपथविधीची थेट तारीख सांगितली.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

काय म्हणाले अजित पवार?

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “दिल्लीला महायुतीचे तिन्ही नेते जाणार आहेत. आम्ही यासर्व विषयांवर चर्चा करणार आहोत. राज्यामध्ये पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री असे सरकार स्थापन होईल. या महिन्याच्या शेवटपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल. 30 नोव्हेंबरला किंवा 1 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होईल,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना शरद पवार गटातील आमदार संपर्कामध्ये असल्याबाबत विचारणा करण्यात आली. शरद पवार गटाचे आमदार संपर्कात आहेत का असा सवाल करताच अजित पवार म्हणाले की, “निकालाला अजून 3 दिवसच झाले आहेत. अजून कशातच काही नाही. माझ्या संपर्कामध्ये कोणीही नाही. विजयी झालेल्या आमच्या आमदारांची बैठक घेतली. जे पराभूत झाले त्यांच्याशी देखील संवाद साधला. सर्व रितसर कामं सुरु केली आहेत. मतदारांचे आभार विजयी आमदारांना मानायला सांगितले आहे,” असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदेंनी सोडला दावा

सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितले की,” राज्यात मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी खूप समाधानी आहे. म्ही नाराज होऊन रडणारे  नाही तर लढणारे आहोत. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रसाठी काम करेन. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. मी काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. सत्तास्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीही अडचण होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल, ” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

Web Title: Ncp ajit pawar talk about cm of maharashtra oath ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 01:59 PM

Topics:  

  • ajit pawar
  • cm of maharashtra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.