Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गद्दारांना पाडा पाडा पाडा…शरद पवारांची वाईच्या सभेत तुफान राजकीय टोलेबाजी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वाईमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी बंडखोर नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 16, 2024 | 07:14 PM
sharad pawar in wai vidhansabha elections 2024

sharad pawar in wai vidhansabha elections 2024

Follow Us
Close
Follow Us:

वाई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. वाईमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. यावेळ त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. वाई मतदारसंघाला वेगळी परंपरा आहे.तुमच्या मनात जे आहे तेच माझ्याही मनात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांना भरभरून दिले मात्र पक्ष फुटल्यानंतर जे सोडून गेले,अशा गद्दारांना पाडा पाडा पाडा..असे ठाम राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार अरुणादेवी शशिकांत पिसाळ यांच्या प्रचारार्थ वाई भाजी मंडई येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले,”राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून लक्ष्मणराव पाटील आमच्या सोबत होते. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा विचार जोपासला. मधल्या काळात भाजपाने पक्ष फोडाफोडीचे राजकारण हाती घेतले. तेव्हा राष्ट्रवादी पक्षातही फूट पडली. त्यावेळी अनेकजण आम्हाला सोडून गेले. त्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मी श्रीनिवास पाटील यांच्या सोबतीने कराडला जात असताना मकरंद पाटील स्वतः मला भेटले. माझ्या गाडीत बसून कराडला आले. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबरच राहीन असे मला त्यांनी ठासून सांगितले. पण दुसऱ्या दिवशी हा गडी गायब झाला. मी माहिती घेतली तर त्यांनी मला कारखान्याचे दुखणं असल्याचे कारण दिले. मी म्हटलं आपण मार्ग काढू पण त्यांनी माघार घेतली नाही,आमचा निर्णय झाला,”असे सांगितले

पुढे शरद पवार म्हणाले की, “आम्ही पाटील कुटुंबाला काय दिले नाही. लक्ष्मण तात्यांना 2 वेळा खासदार केले,तर यांना गावच्या सरपंच पदापासून तीन वेळा आमदार केले. किसनवीर कारखान्याचे चेअरमन केले,भावाला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद,आता राज्यसभेचे सदस्यत्वपद पण मिळाले,गावचे सरपंचपद पण यांनाच पाहिजे.जे दिसलं ते आपलंच म्हणण्याची भूमिका त्यांची आहे.लक्ष्मणतात्या असते तर ही वेळ उदभवली नसती. साहेब आमचे दैवत आहेत,साहेबांशी आमची निष्ठा आहे, साहेब आमच्या हृदयात आहेत अन आमच्या खिशातही साहेबच आहेत,असे मकरंद पाटील सर्वत्र सांगत असल्याचे निदर्शनास आणून पवार साहेबांनी तुमच्या खिशात किंवा हृदयात बसण्याएवढी माझी उंची नाही,”अशा शब्दांत उपरोधिक टीका केली.

संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी? निवडणूक आयोगाकडे काँग्रेस नेत्यांची तक्रार

“किसनवीर आबा,लक्ष्मणशास्त्री जोशी,विठ्ठलराव जगताप, प्रतापराव भोसले यांच्या सारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाची वाईला परंपरा आहे. मदनराव पिसाळ यांनी समाजहिताचे राजकारण केले. या मतदारसंघातील मतदार कधीही जातीयवादी धर्मांध शक्तींना साथ देणार नाही अशी मला खात्री आहे. स्त्रियांना संधी मिळाली तर त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या मतदारसंघात आम्ही अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. तरुणांच्या हाताला काम,महिलांचे स्वावलंबन,शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक,औद्योगिक विकासासोबतच स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अरुणादेवी यांना विजयी करा,त्यांच्या पाठीशी आमची शक्ती आणि ताकत उभी आहे,” असे आवाहन शरद पवार यांनी केले.

“१९८० साली ५८ आमदार फुटले तेव्हा आम्ही परत निवडणूकीला सामोरे गेलो,तेव्हा ५८ मधील एकही उमेदवार निवडून आला नाही,महाराष्ट्र कधीही गद्दारांना थारा देत नाही,अशी आठवण पवार साहेबांनी आवर्जून सांगितली.
२ कर्तृत्वाचा ठेका फक्त पुरुषांकडे असतो हे खरं नाही,संधी मिळाली तर स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवतात,असे सांगून पवार साहेब यांनी देशातील सर्वाधिक खणखर स्त्री म्हणून आजही इंदिरा गांधींचा उल्लेख होतो असे सांगितले.तर माझी मुलगी 4 वेळा संसदेत निवडून गेलीय,लोकसभेतील हजेरी आणि कामगिरी मध्ये ती देशात नंबर दुसऱ्या नंबरची आहे.अरुणादेवी यांच्या मध्ये तीच कुवत असल्याने त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून उठावदार कामगिरी केली. विधानसभेतही त्या अशाच कर्तबगार कामगिरी करतील,” अशी मला खात्री असल्याचे शरद पवार म्हणाले

भाजपची टीम लपून संविधानाची हत्या करतीये…मोदींना स्मृतीभ्रंश झालाय..; राहुल गांधींचा घणाघात

या सभेमध्ये उमेदवार अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, “यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे विचार जोपासताना दिवंगत नेते मदनराव पिसाळ यांनी 20 वर्षे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे समाजकारण व राजकारण केलं. त्यांनी धोम, बलकवडी व नागेवाडी धरण उभारून दुष्काळी भागाला पाणी देण्यास अग्रक्रम दिला. त्यांच्याच आदर्श विचारांचा वारसा घेऊन मी काम करेन. सरपंच पदापासून आमदार खासदार पदापर्यंत सर्वच पदे आपल्या घरात घेणाऱ्या आमदारांना मतदासंघातील तीनही तालुक्यात एकही लायक व्यक्ती नाही भेटला नाही का असा सवाल उपस्थित केला. महाविकास आघाडीने आपल्या पंचसूत्री मध्ये महिला सुरक्षेला प्राधान्य दिले असून शेतकऱ्यांचे प्रश्न पर्यटन विकास तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करण्या साठी मी कटिबद्ध राहिन.मला एकदा संधी द्या मी महिला म्हणून कुठेही कमी पडणार नाही,संधीचे सोन करून दाखवेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किरण माने म्हणाले,”पेशवाई मोगलाई नंतर राज्यातील महायुती सरकारने गद्दारांना व भ्रष्टाचाऱ्यांना खतपाणी घालत आहेत. स्वाभिमानी जनता त्यांनी निश्चित जागा दाखवून देईल. संविधानाने तुम्हाला ताकद दिली आहे. महिलांना सुरक्षितता देण्याऐवजी 150  रुपयांची भीक देणाऱ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका.”

Web Title: Ncp sharad pawar targets the mahayuti wai assembly election 2024 campaign sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Election
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
1

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं
2

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

NCP Star Campaigner List: राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अमोल मिटकरींना दिली नवीन जबाबदारी
3

NCP Star Campaigner List: राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अमोल मिटकरींना दिली नवीन जबाबदारी

Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर
4

Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.