
जळगावमध्ये अजित पवारांना मोठा धक्का
महानगराध्यक्ष पदावरील नेत्याने दिला राजीनामा
निवडणुकीआधी तापले राजकारण
जळगाव: राज्यात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. अनेक ठिकाणी महायुती तर अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढणार आहे. काही भागात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारण पाहून निवडणूक लढवली जाणार आहे. त्यातच आता अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यात अजित पवारांना धक्का बसला आहे.
जळगाव जिल्ह्यात अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. महानगरपालिका निवडणुकीआधी त्यांच्या पक्षातील बड्या नेत्याने अजित पवारांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात लवकरच महानगरपालिका निवडणूक होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिला आहे. अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.
Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन महिला आरोपींना उमेदवारी देण्यात आली आहे. कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या आरोपी सोनाली कोमकर आणि लक्ष्मी कोमकर यांना पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावरून निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगांतून निवडणूक लढवणार आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिलादेखील उमेदवारी जाहीर केली होती. त्यानतंर आता पुण्यातील गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांवर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही यावरून उपस्थित होत आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या 5 कोटी 40 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्या दोघीही कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आता बंडू आंदेकर आणि संबंधितांना प्रचार करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ, शक्तीप्रदर्शन किंवा नियमभंग करता येणार नाही.