• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Prahar Partys Candidate Car Has Burnt In Yavatmal Nrka

ऐन विधानसभा निवडणुकीत ‘प्रहार’च्या उमेदवाराची कारच पेटवली; कारण…

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले बिपीन चौधरी यांची घरासमोर लावलेली कार काही अज्ञातांनी पेटवून दिली. ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान झाल्याचे समोर आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 17, 2024 | 02:51 PM
ऐन विधानसभा निवडणुकीत 'प्रहार'च्या उमेदवाराची कारच पेटवली; कारण...

File Photo : Car Fire

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

यवतमाळ : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारीही केली जात आहे. त्यातच यवतमाळ विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले बिपीन चौधरी यांची घरासमोर लावलेली कार काही अज्ञातांनी पेटवून दिली. ही घटना मध्यरात्रीच्या दरम्यान झाल्याचे समोर आले आहे.

हेदेखील वाचा : ‘सरकार बदलण्याची आता वेळ आली, कर्तृत्त्ववान माणसांच्या हाती सरकार द्यायचंय’; शरद पवारांचं मतदारांना आवाहन

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात हजारो कुणबी-मराठा मतदार आहेत. तरीही एकाही बड्या राजकीय पक्षाने समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही. त्यामुळे या समाजात नाराजी आहे. कुणबी मराठा समाजाच्या वतीने नुकतेच बिपीन चौधरी यांच्यासाठी सहविचार सभेचे आयोजन केले होते. या सभेत चौधरी यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय समाजबांधवांनी घेतला. त्यांच्या कुणबी समाजातील वाढत्या प्रभावामुळे अनेकांनी धास्ती घेतली असून, दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. कुणबी समाजाच्या वाढत्या पाठिंब्यामुळे विचलित होऊन कुणीतरी राजकीय द्वेषातून कार पेटविल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्टीकरण बिपीन चौधरी यांनी सांगितले.

आगीमुळे कार पूर्णत: जळून खाक

यवतमाळच्या गुरुकृपा नगरीमध्ये बिपीन चौधरी हे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास अज्ञातांनी त्यांची महिंद्रा केयूव्ही 100 ही कार पेटवून दिली. कार पेटवल्याचे लक्षात येते तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आगीमुळे कार पूर्णत: जळून खाक झाली.

वंचितकडून अपक्ष उमेदवाराला फासले काळे

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचितला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

वंचितचे कार्यकर्ते आक्रमक

अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून शैलेश कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले.

हेदेखील वाचा : मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे

Web Title: Prahar partys candidate car has burnt in yavatmal nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
Summer in February: अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार

Summer in February: अरे बापरे! जिल्ह्यात पारा ३३ अंशांच्या पार! फेब्रुवारीतच गरमा गरम चटके; यंदा उन्हाळा तापणार

Feb 16, 2026 | 03:18 PM
बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

Feb 16, 2026 | 03:13 PM
Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

Feb 16, 2026 | 03:11 PM
Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

Feb 16, 2026 | 03:07 PM
ENG vs ITA, T20 World Cup : इंग्लंडसाठी विजय आवश्यक! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; इटली करणार गोलंदाजी 

ENG vs ITA, T20 World Cup : इंग्लंडसाठी विजय आवश्यक! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; इटली करणार गोलंदाजी 

Feb 16, 2026 | 03:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.