Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईने त्रस्त जनता भाजपला घरचा रस्ता दाखवेल…: पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांनी घेतली आक्रमक भूमिका

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक लढत सुरु आहे. टीका टिप्पणी केली जात आहे. पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 01, 2024 | 04:46 PM
pune congress leader target bjp

pune congress leader target bjp

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. प्रमुख लढत ही महायुती व महाविकास आघाडीमध्ये होणार असल्यामुळे नेत्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. पुण्यामध्ये कॉंग्रेस नेत्यांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
महागाई, बेरोजगारी, असुरक्षितता तसेच अन्याय-अत्याचाराच्या घटनांना वैतागलेली जनता आगामी विधानसभा निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाला घरचा रस्ता दाखवेल. लाडक्या बहिणींना फुकटचे दीड हजार नको आहेत, तर त्यांच्या हाताला काम आणि सुरक्षित वातावरण अधिक महत्वाचे आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली. ‘एकी हेच बळ’ समजून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले असल्याचेही सुरवसे पाटील म्हणाले.

शाळा-महाविद्यालयातील मुलींची तसेच राज्यात सर्वत्र महिला सुरक्षा महायुती सरकारच्या काळात रामभरोसे झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून भीक नको, पण हाताला काम द्या, असा सूर आता सर्वसामान्य जनतेतून उमटू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने काँग्रेसला साथ दिली. आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. भाजप सरकार जनतेला धार्मिक व जातीयवादी मुद्द्यांवर भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, भूलथापांना आता महागाईने पिचलेली जनता भीक घालणार नाही. ईडी, सीडी, आयकर विभागाची भीती दाखवून, पक्ष फोडून सत्ता मिळवणाऱ्यांना आता जनता घरी बसवणार, हे दिसत आहेत. सर्वसामान्य जनतेने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक हातात घेतली आहे, असेही सुरवसे-पाटील यांनी नमूद केले.

हे देखील वाचा : अखेर एकनाथ खडसेंनी घेतली महाविकास आघाडीची बाजू; व्यक्त केला विजयाचा विश्वास

आम्हाला आश्वासन नको, न्याय हवा आहे. सामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या काँग्रेस सरकारची गरज आहे, हीच भावना जनमाणसामध्ये निर्माण झाली आहे. महागाईने कष्टकरी, कामगारांना दिवाळीचे दोन घाससुद्धा खाता येईना अशी परिस्थिती आज झाली आहे. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन महागाई गगनाला भिडवणाऱ्या सरकारला नेस्तनाबूत करायची वेळ आली आहे. ‘उठा उठा मतदान करा आणि भाजप सरकार हद्दपार करा’ अशी ठोस भूमिका जनतेने घेतल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.

हे देखील वाचा : मला हरामखोर, भिकारी म्हटलं, उंदीर म्हणून हिणवलं…; समरजित घाटगे यांनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांना मदत करण्यापेक्षा एकदिलाने काँग्रेस मजबुतीकरणासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आणि जनहिताचे ठरणार आहे.
– रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

Web Title: Pune congress leader target bjp for amenities and facilities before vidhansabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 04:46 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
1

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
2

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
4

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.