Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election Result 2024 : एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी वारी करणारे किती आमदार झाले विजयी? कोणाला मिळाला दणका?

विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निकालामध्ये महायुतीला मोठा विजय मिळला. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणाऱ्या पाच आमदारांना पराभव स्वीकारावा लागला.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 24, 2024 | 02:33 PM
शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, महापौरांसह १२ नगरसेवकांचा पक्षाला रामराम

शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, महापौरांसह १२ नगरसेवकांचा पक्षाला रामराम

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीने विक्रमी असा विजय मिळवून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे व शरद पवार यांना धक्का चितपट करत देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने देखील विजयश्री खेचून आणला आहे. शिंदे गटाला 57 जागा तर अजित पवार यांना 41 जागांवर यश मिळाले आहे. महाविकास आघाडीने 46 जागांवर यश मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे मिळून मिळवलेल्या जागा या शिंदे गटाने मिळवल्यांपेक्षा कमी आहे.

मागील अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केले. ठाकरे यांच्यापासून वेगळे होते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी सूरतवरुन गुवाहाटी गाठली. या सर्व आमदारांवर त्यावेळी जोरदार टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य काय असेल यांची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली. निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांनी केलेले बंड आवडले आहे का याची प्रचिती येणार होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांपैकी केवळ 5 आमदारांना पराभवाचा फटका बसला आहे.  एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या या पाचही आमदारांना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी हरवले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीच्या बंडावेळी त्या ठिकाणीचे वर्णन करणारे नेते प्रसिद्ध झाले होते. काय झाडी काय डोंगर..असे गुवाहाटीचे वर्णन करणारे शहाजीबापू पाटील यांचा यंदाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. शहाजीबापू पाटील यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पराभव केला. 25 हजारांच्या मतांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला. त्याचबरोबर माहिम मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत अशा तिरंगी लढतीमध्ये शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा पराभव झाला. ही जागा मिळवण्यात ठाकरे गटाला यश आले.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झालेल्या यामिनी जाधव यांना देखील पराभवाचा फटका बसला आहे. यामिनी जाधव यांचा 31 हजारांच्या मतांनी पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या ठाकरे गटाचे उमेदवार मनोज जामसुतकर यांनी 80 हजारांहून अधिक मत मिळवून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर संजय रायमूलकर आणि ज्ञानराज चौगुले या दोन आमदारांना देखील पराभव स्वीकारावा लागला आहे. संजय रायमूलकर यांना मेहकर या मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी जोरदार लढत दिली आहे. ज्ञानराज चौगुले यांना ठाकरे गटाचे नेते प्रवीण वीरभद्राय्या स्वामी यांनी जोरदार टक्कर देत विजय मिळवला. शिंदे गटाचे 5 आमदारांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांनी धुळ चारत विजय मिळवला आहे.

Web Title: Sada saravankar yamini jadhav shahajibapu patil lost who come guwahati with eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 02:33 PM

Topics:  

  • assembly election 2024
  • Eknath Shinde
  • maharashtra election 2024

संबंधित बातम्या

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
1

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका
2

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत
3

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.