Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची तुटली युती; मनोज जरांगे पाटलांची देणार साथ?

विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून पक्ष उमेदवार जाहीर करत आहे. पण जागावाटपावरुन नाराज होऊन संभाजी ब्रिगेडने शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ सोडण्याचे ठरवले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 23, 2024 | 02:20 PM
शिवसेनेच्या 'या' नेत्याची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता

शिवसेनेच्या 'या' नेत्याची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे जोरदार राजकारण रंगत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून प्रचार केला जात आहे. तसेच महायुतीच्या उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. यामुळे नेत्यांच्या बैठका देखील वाढल्या आहेत. यामध्ये आता उद्ध ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. संभाजी ब्रिगेड व शिवसेना ठाकरे गटाची युती तुटणार आहे. मागील अडीच वर्षे असणारी ही युती तुटणार असून यामुळे शिवसेना ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे जागावाटप व फॉर्म्युला यावर चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीमध्ये विचारले जात नसल्यामुळे अनेक लहान घटक पक्ष नाराज आहेत. आता संभाजी ब्रिगेड देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या जागांवरती उमेदवार दिला जात नसल्याने ते नाराज आहेत. शिवसेना ठाकरे गटासोबत युती सोडून राज्यभरामध्ये 50 हून अधिक उमेदवार जाहीर करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाराज असून त्यांनी आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. पण यामध्ये आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत देखील साथ देतील अशी चर्चा आहे.

हे देखील वाचा : अखेर ठरलं! बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार देणार लढत

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये उतरण्याचे ठरवले आहे. मराठा बांधवांशी संवाद साधून त्यांनी मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रमुख पक्षांसह अनेक घटक पक्षांचे देखील प्रयत्न चालू आहेत. काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने मराठा नेते जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड मनोज जरांगें यांच्याबरोबर जाणार आहेत. त्यामुळे आता राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संभाजी ब्रिगेड यांची युती दिसणार का? अशी चर्चा सुरु आहे. लवकरच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून यादी जाहीर नाहीच

महायुतीच्या सर्व पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वात पहिले भाजपने यादी जाहीर करुन बाजी मारली. त्यानंतर शिंदे गट व अजित पवार गटाची देखील पहिली यादी जाहीर झाली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाची यादी जाहीर झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून तातडीने बैठक घेण्यात आली होती. कॉंग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जागावाटपावर अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. यावरुन ही बैठक बोलावली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाची संभाजी ब्रिगेडने देखील साथ सोडली होती.

Web Title: Sambhaji brigade and uddhav thackerays alliance broke before assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • Sambhaji Brigade
  • Uddhav Thackeray
  • Vidhansabha Election 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
1

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.