
फोटो सौजन्य सोशल मिडिया
अभिनेत अभिजित केळकर यांने असे म्हटले आहे की, ज्यांच्या या जागेत जमीन आहेत. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे NOC घेतलेले नाही. यामुळे या जागेचे मालक कोर्टात गेलेले आहेत, उद्या सगळं जमीनदोस्त केल्यावर कोर्टाने प्रोजेक्टलाच स्टे दिला तर ना लोकांना घरं मिळणार ना भाडं, कसा होणार आहे हा प्रोजेक्ट ? असा सवाल अभिनेता अभिजित केळकर याने फेसबुक पोस्ट मध्ये मांडला आहे. तसेच बाजुला मिलिटरी कॅम्पस आहे, COD, त्यानुसार, ठराविक हद्दीत, ठराविक एका उंचीच्या वर इमारती बांधायला परवानगी असूच शकत नाही, in that case, घरं जमीनदोस्त केल्यावर, डिफेन्सने objection घेतलं तर मग कसा होणार आहे हा प्रोजेक्ट? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
येथील स्थानिक लोकांना रोज रात्रंदिवस बिल्डरचे गुंड येऊन धमक्या देऊन घरं रिकामी करायला लावत आहेत आणि अर्धवट डॉक्युमेंट्स करून तात्काळ ही जागा अशी अर्धवट तोडत आहेत, गेली ५०-६० वर्षं तिथे राहिलेल्या पण बिल्डरला न घाबरणाऱ्या लोकांना SRA करवी, अपात्र करण्यात आलं आहे, गावगुंडांनी तिथे अनधिकृत झोपड्या बांधून त्या पात्र करून घेतल्या आहेत, हा SRA चा कारभार आहे.असे त्यांनी म्हटले आहे.
ह्या ऊपर जाऊन मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तिकडच्या so called लोकप्रतिनिधींना विचारतो की, आम्हा चाळीतल्या लोकांना त्यांची हक्काची घरं मिळतील, का ? अपात्र करण्यात आलेल्या लोकांना पात्र करतील, ह्याची जबाबदारी तुम्ही घेताय का ? तसं लेखी देत असाल तर तुम्ही म्हणाल तिकडे आम्ही सह्या करू, बोला घेताय जबाबदारी ? असे स्पष्ट मत अभिनेता अभिजित केळकर यांने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये केले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगत अभिजितने म्हटले की, “माझ्या जीवाला धोका आहे, मी घरी आई, बायको आणि मुलांना सांगूनच बाहेर पडलो आहे.” कोणाचेही नाव न घेता आपण न्यायासाठी लढत असल्याचे सांगत त्याने आपल्याला हक्काची घरे मिळावीत अशी मागणी केली आहे. त्याच्या या धक्कादायक पोस्टमुळे सिनेसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.