Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spain News : संगणकीय सुरक्षा यंत्रणा बंद पडली; नियंत्रण कक्षाच्या चुकीच्या निर्णयामुळे ६४ जणांचा बळी?

Spain News : स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वे गाड्यांची धडक होऊन किमान ६४ जणांचा मृत्यू झाला. संगणकीय सुरक्षा यंत्रणेतील बिघाडानंतर नियंत्रण कक्षाने घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 28, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • संगणकीय सुरक्षा यंत्रणेत तांत्रिक बिघाड
  • नियंत्रण कक्षाच्या निर्णयावर संशय
  • अपघाताच्या कारणांचा शोध सुरू
Spain News : स्पेनमधील भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत किमान ६४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. दोन हायस्पीड रेल्वे गाड्यांची धडक झाल्यानंतर हा भीषण अपघात घडला. प्राथमिक तपासात रेल्वेची स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्पेनचे परिवहन मंत्री ऑस्कर पुएन्ते यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

संगणकीय सुरक्षा यंत्रणेत तांत्रिक बिघाड

रेल्वे मार्गावरील स्वयंचलित सुरक्षा आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ही यंत्रणा रेल्वेचा वेग, स्थान आणि दोन गाड्यांमधील सुरक्षित अंतर नियंत्रित करण्याचे काम करते. यंत्रणा बंद पडल्यानंतर काही गाड्या मार्गावरच थांबल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे नियंत्रण कक्षामार्फत व्यवस्थापन करण्यात आले.

France News : उल्कापिंडांपासून बनवतो महागडे चाकू; एका चाकूची किंमत तब्बल ६.९ लाख रुपये; कारागिराची अनोखी कला चर्चेत

नियंत्रण कक्षाच्या निर्णयावर संशय

तांत्रिक बिघाडानंतर नियंत्रण कक्षाने एका हायस्पीड रेल्वेला पुन्हा प्रवास सुरू करण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच मार्गावर दुसरी रेल्वे गाडी थांबलेली होती. त्यानंतर दोन्ही गाड्यांची धडक झाली. या परिस्थितीत नियंत्रण कक्षाने घेतलेला निर्णय योग्य होता का, याची चौकशी केली जात आहे. तांत्रिक बिघाड आणि मानवी चूक यांचा अपघाताशी संबंध होता का, हे तपासले जात आहे.

Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले

अपघाताच्या कारणांचा शोध सुरू

दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. रेल्वेच्या ब्लॅक बॉक्समधील माहिती, सिग्नल यंत्रणेची स्थिती आणि नियंत्रण कक्षातील संभाषण तपासले जात आहे.

स्पेनचे परिवहन मंत्री ऑस्कर पुएन्ते यांनी या अपघातामागील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, अपघाताचे अंतिम कारण अद्याप निश्चित झालेले नाही. तांत्रिक बिघाडानंतर नेमके कोणते निर्णय घेण्यात आले आणि त्यात कोणाची चूक होती, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

Web Title: Spain train accident safety system failure human error 2026 cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • death mystery
  • marathi new
  • Railway Accident

संबंधित बातम्या

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
1

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.