फोटो सौजन्य सोशल मिडिया
रडता रडता लगेचं त्यांनी हसत मुखाने अविनाश नारकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या मागिल प्रत्यक्ष अनुभव नसून आगामी चित्रपटातील पात्राचा अभिनय होता. “हे होतं रिल, आता रिअल सांगतो… सोशल मीडियाच्या रिलमध्ये जे काही दिसत असत ते सगळ रिअल नसतं,” असे म्हणून अविनाश नारकर यांनी आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली. सत्य घटनेवर आधारित ‘जनक’ त्यांचा नवा चित्रपट येत्या 13 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही अनोखी आणि लक्षवेधी रणनीती वापरली होती.
नुकताच या चित्रपटाचा टिझर लॅाच झाला असून, अविनाश नारकर यांच्या ‘ जनक ‘ चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव, सुरेश विश्वकर्मा, अनुष्का पिंपुटकर आणि विनिता काळे हे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सोशल मीडियावरील रिल्समधून नेहमीच सक्रिय आणि उत्साही दिसणाऱ्या नारकर यांचा हा भावनिक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, ‘जनक’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
वडिलांवरील झालेले आरोप, त्यांच्या सन्मानासाठी लढणारी मुलगी आणि सत्याच्या शोधात घेणारा न्यायालयीन संघर्ष या सगळ्यामुळे ‘जनक’च्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये न्यायाचा विजय होणार की आरोपांच्या सावटाखाली एका बापाचा स्वाभिमान हरवणार, याचं उत्तर चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कंवर आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ हा कोर्टरूम थ्रिलर 13 नोव्हेंबर 2026 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.






