Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘स्वामींची भूमिका करण्याची जबाबदारी खूप मोठी, पेलण्याची आता गरज’ – सुनील गोडसे

जय जय स्वामी समर्थ ही मराठी मालिका गेले ५ वर्ष कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. सुनील गोडसे यांनी ही जबाबदारी आता स्वामींच्या भूमिकेतून पेलली आहे. खास बातचीत

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 13, 2026 | 01:22 PM
स्वामी समर्थांच्या भूमिकेत अभिनेता सुनील गोडसेंसमोर काय आहेत आव्हानं

स्वामी समर्थांच्या भूमिकेत अभिनेता सुनील गोडसेंसमोर काय आहेत आव्हानं

Follow Us
Follow Us:

‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका गेले ५ वर्ष कलर्स मराठीवर प्रसारित होत असून ही मालिका अनेक प्रेक्षक पाहतात. आपल्याकडे अनेकजण स्वामी समर्थांचे भक्त आहेत आणि मनापासून ही मालिकादेखील पाहतात. स्वामींचे अनुभव येणारे लोकही अनेक आहेत. ही मालिका करताना नक्की काय आव्हानं आहेत आणि या मालिकेसाठी स्वामींची भूमिका साकारताना नक्की कशी तयारी केली याबाबत अभिनेता सुनील गोडसे यांनी ‘नवराष्ट्र’ सह खास बातचीत केली आहे. 

स्वामींची भूमिका साकारताना कोणती आव्हानं आहेत आणि कशी तयारी केली? असे विचारले असताना सुनील गोडसे म्हणाले की, ‘स्वामींची भूमिका करायची ही मालिका सुरू झाली तेव्हापासून माझ्या मनात होतं. ही संधी काही परत आपल्या वाट्याला येणार नाही त्यामुळे जेव्हा मला विचारणार करण्यात आली मी भूमिकेसाठी पटकन होकार दिला आणि मुळात कामाचा अनुभव हा अविस्मरणीय आहे. आव्हानाबाबत सांगायचं झालं तर स्वामींची भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि तेच एक आव्हान आहे. अशा धाटणीची भूमिका करायला माझ्या वाट्याला आली हेच माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आणि ती पुरेपूर साकारण्याचा मी प्रयत्न करत आहे’. 

श्री स्वामी समर्थांची होते ‘या’ राशींवर कृपा, करिअरमध्ये प्रगतीसह मिळतो आशीर्वाद; जीवनात सुखसमृद्धीची उधळण

स्वामींच्या भूमिकेसाठी तुम्ही काय तयारी केली होती असं जेव्हा सुनील यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘खरं तर आतापर्यंत १८०० भाग पूर्ण झाले आहेत आणि जेव्हा मी ही भूमिका स्वीकारली तेव्हा सर्वात पहिल्यांदा स्वामींची बखर वाचली, स्वामींचे फोटो संदर्भ घेतले की, स्वामी कसे बसत असतील, कसे बोलत असतील. या बखरीतून स्वामी कळले वा आलेल्या अनुभवातून जे स्वामी कळले त्यानुसार मी तयारी केली. याशिवाय एक जुना चित्रपट होता ज्यामध्ये दिग्गज कलाकार दाजी भाटवडेकरांनी काम केले होते. ही भूमिका साकारण्याआधी त्यांचा चित्रपट पाहिला. त्यातून संदर्भ घेतला. स्टाईल मात्र मी स्वतः जी करता येईल ते अनुभव दाखवायचा प्रयत्न केलाय. स्वामी जसे रागीट होते वा प्रेमळ होते हे दाखवायचा प्रयत्न करतोय आणि ते प्रेक्षकांनाही आवडतंय.’  

इतकी मोठी जबाबदारी किती दडपण आहे? म्हटल्यावर ते म्हणाले की, ‘खरं तर स्वामींची भूमिका हे दडपण नाही तर मोठी जबाबदारी आहे आणि ते पेलण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करत आहे. अनेक जण मला प्रसारित झालेले भाग बघून सांगतात की,तुमच्या डोळ्यात बघून आम्हाला संवाद साधता येत नाही, कारण आम्हाला स्वामीच जाणवतात. हीच खरी कामाची पोचपावती आहे. त्यामुळे अजिबात दडपण नाही पण जबाबदारी पेलतोय हे नक्की’

सध्या हरिप्रिया गोष्ट सुरू आहे. कलियुगात विठुरायासोबत लग्न करायची इच्छा आहे कशी स्वामी पूर्ण करणार आहे काय लीला बघायला मिळेल? यावर अगदी मनमोकळेपणाने हसत सुनील गोडसे यांनी उत्तर दिलं की, ‘स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत असतात. कशा पद्धतीने करणार हे पहावं आहे. इच्छा तर स्वामी पूर्ण करणारच पण त्याची पद्धत नक्की कशी असेल हे प्रेक्षकांना नक्की पाहताना नक्की आवडेल.’

Shree Swami Samarth : स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हणतात ? यामगील कथा तुम्हाला माहितेय का ?

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला कशा मिळत आहेत? यावर पटकन उत्तर देताना सुनील गोडसे म्हणाले की, ‘प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप सकारात्मक आहेत. तुम्ही स्वामींंसारखेच दिसता, चालता असंही अनेकांनी सांगितलं. पटकन रिलेट होतात हे छान वाटतं. प्रेक्षकांनी स्वामींच्या भूमिकेत छान स्वीकारलं आहे हे खूप चांगलं वाटतंय. जेव्हा काम सुरु केलं तेव्हा कदाचित प्रेक्षकांना मला स्वीकारायला ५-६ महिने जातील असं वाटलं होतं. पण स्वामींच्या कृपेने हे मला पहिल्याच महिन्यात प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. लोकांनी मला स्वीकारले हीच खूप आनंदाची बाब आहे असं अगदी सहजपणाने म्हणत असंच प्रेम रहावं असंही सांगायला ते विसरले नाहीत. 

Web Title: Actor sunil godse exclusively shared thoughts of working in jai jai swami samarth marathi serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial update
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’
1

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका
2

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

Muramba Marathi Serial : चार वर्षांचा प्रवास निघाला शेवटाकडे! ‘मुरांबा’ मालिका जाणार ऑफ एअर; मुख्य अभिनेता झाला भावूक
3

Muramba Marathi Serial : चार वर्षांचा प्रवास निघाला शेवटाकडे! ‘मुरांबा’ मालिका जाणार ऑफ एअर; मुख्य अभिनेता झाला भावूक

Serial Update: ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर स्टार प्रवाहची ‘ही’ मालिका होणार बंद; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत
4

Serial Update: ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर स्टार प्रवाहची ‘ही’ मालिका होणार बंद; अभिनेत्रीची भावूक पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.