
फोटो सौजन्य - Social Media
ज्योती सक्सेनाने या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने या संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नमूद केले आहे की, “कायदेशीर सूचना (LEGAL NOTICE)! गेल्या दोन महिन्यांपासून एका अज्ञात व्यक्तीने माझ्या Instagram खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवून माझी ओळख, छायाचित्रे आणि वैयक्तिक ब्रँडचा गैरवापर करत खोटी व बदनामीकारक माहिती पसरवल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. कृपया नोंद घ्यावी की, ही कृती सायबर कायद्यांनुसार अत्यंत गंभीर गुन्हा आहे. यामध्ये ओळख चोरी (Identity Theft), बनावट रूप धारण करणे (Impersonation) आणि बदनामी (Defamation) यांचा समावेश होतो. या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरुद्ध आमच्या कायदेशीर पथकाने कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. कोणतीही व्यक्ती जर अशा खोट्या माहितीच्या प्रसारात सहभागी होत असेल, प्रोत्साहन देत असेल किंवा ती पुढे पाठवत असेल, तर तिच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. माध्यम प्रतिनिधी, सहकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी हे खाते पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत त्या खात्याकडून येणाऱ्या कोणत्याही संदेशांशी संपर्क साधू नये किंवा प्रतिसाद देऊ नये, अशी विनंती करण्यात येते.”
मुळात, ही पोस्ट सध्या पाहता येत नाही आहे कारण Jyoti Saxena ची ऑफिशिअल इंस्टाग्राम ID @iamjyotisaxen सध्या बंद झाली आहे. ज्योतीचे म्हणने आहे की तिची Instagram ID गेल्या काही महिन्यांपासून Hack झाली आहे.
काय आहेत Chats?
Chats मध्ये Jyoti कडून एका विद्यार्थ्याला मेसेज गेला आहे. यामध्ये Nude Video Call साठी ज्योती विद्यार्थ्याकडून 20 हजारांची मागणी करत आहे. त्यांच्यात रक्कमेवरुन चर्चा होत आहे. शेवटी, जेव्हा ज्योतीला कळते की समोर विद्यार्थी आहे तेव्हा त्यांच्यात 8 हजारांचा सौदा होतो. ज्योतीने पाठवलेल्या QR Code वर 8 हजार येताच त्या विद्यार्थ्याला ब्लॉक केले जाते आणि त्याचे पैसे घेऊन अभिनेत्री पसार होते. परंतु, अभिनेत्रींच्या म्हणण्यानुसार, तिची ID Hack झाली आहे, आणि कुणी इतर व्यक्ती तिच्यानावाने या सगळ्या गोष्टी करत आहे.