Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐश्वर्या शेटे आता रंगभूमी गाजवणार, ‘आता थांबवायचं कसं?’ नाटकातून करणार दमदार पदार्पण!

दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक 'युनिव्हर्सिटी' असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 01, 2026 | 07:03 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे ५ ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक ‘युनिव्हर्सिटी’ असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

शूटिंगचे ‘क्विक डिलिव्हरी’ आणि नाटकाचे ‘लाईव्ह अनुभव’

आपल्या या पहिल्या वहिल्या नाटकाबाबत बोलताना ऐश्वर्या सांगते, “मालिकांच्या शूटिंगमध्ये आपल्याला पटकन प्रतिसाद द्यावा लागतो, कधीकधी ‘क्विक डिलिव्हरी’ करावी लागते. पण नाटकाच्या तालमींत एका वाक्याचे विविध अर्थ आणि हावभाव कसे बदलतात, हे शिकायला मिळतंय. मालिकांमधून प्रसिद्धी मिळते, पण नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या ‘लाईव्ह’ प्रतिक्रियांची जी ऊर्जा मिळते, ती काही वेगळीच आहे. मालिकेच्या सेटवर चुका सुधारण्यासाठी १०-१५ दिवस मिळतात, पण रंगमंचावर ‘वन टेक’ मध्ये सगळं परफेक्ट करायचं असतं, त्याची एक वेगळीच धाकधूक आणि एक्सायमेंट आहे!”

सुकन्या मोने-गिरीश ओक; प्रत्यक्ष आयुष्यातील ‘आई-बाबा’

या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक हे तिचे आई-बाबा साकारत आहेत. याबद्दल ती भावूक होऊन सांगते, “सुकन्या ताईंच्या मायेने आणि गिरीश सरांच्या अनुभवाने मला या भूमिकेत घडवलंय. तालमींच्या वेळी सुकन्या ताईंच्या ‘अलीबाबाच्या गुहेसारख्या’ असलेल्या बास्केटमधून सतत मिळणारे खाऊ आणि त्यांची आपुलकी यामुळे आमच्यात खरोखरच आई-मुलीचं नातं निर्माण झालंय. ही दिग्गज माणसं माझ्यासाठी एका विद्यापीठासारखी आहेत.”

‘निर्जीव फोन’ आणि ‘जिवंत संवाद’

नाटकाच्या विषयावर भाष्य करताना ऐश्वर्या तरुणाईला एक महत्त्वाचा संदेश देते: “आजच्या तरुण पिढीला सतत मोबाईल आणि टेक्नॉलॉजीची सवय लागली आहे. ‘निर्जीव फोन स्मार्ट झालाय आणि जिवंत माणूस बावळट’ असे एक वाक्य नाटकात आहे, जे आजचं भीषण वास्तव आहे. या नाटकातून आम्ही एकच संदेश देतोय – पालकांशी ‘ट्रान्सपरन्सी’ ठेवा आणि पालकांनी मुलांच्या चुकीवर भडीमार करण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन ‘मी तुझ्यासोबत आहे’, हे आश्वासन द्या. हा ‘जनरेशन गॅप’ कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

मालिका विश्वात ज्या प्रेमाने प्रेक्षकांनी ऐश्वर्याला स्वीकारले, त्याच प्रेमाची अपेक्षा ती या नाटकासाठी व्यक्त करते. “हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर अनेक मुलींसाठी एक ताकद आहे. तरुण पिढीने आपल्या पालकांसोबत हे नाटक आवर्जून पाहावं आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं, हीच माझी इच्छा आहे,” असे तिने सांगितले.

Web Title: Aishwarya shete debut marathi drama ata thambvaycha kasa news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi movie

संबंधित बातम्या

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
1

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व
2

Santosh Davakhar: कोण आहेत ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर? ‘धुरंधर’ला मागे टाकत ऑस्करमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका
3

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका

Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्या …..
4

Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्या …..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.