Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dashmi Marathi Movie: ‘दशमी’ उलगडणार बाप-लेकीच्या नात्याचा हळवा बंध; मकरंद अनासपुरे-गौरी इंगवले साकारणार खास भूमिका

Dashmi Marathi Movie: मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले ‘दशमी’ चित्रपटात बाप-लेकीची भूमिका साकारणार आहेत. योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 20, 2026 | 09:20 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Dashmi Marathi Movie: बाप-लेकीचं नातं हे प्रेम, माया आणि भावनांनी जोडलेलं खास नातं असतं. मुलीच्या प्रत्येक स्वप्नामागे खंबीरपणे उभा राहणारा बाबा आणि वडिलांच्या प्रेमात आपलं विश्व पाहणारी लेक यांच्यातील हळवा बंध आता ‘दशमी’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’मध्ये अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गौरी इंगवले बाप-लेकीची भूमिका साकारत आहेत. प्रभाकर आणि लक्ष्मी या व्यक्तिरेखांमधून त्यांच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जवळीक प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दिग्दर्शनाची धुरा योगेश पांडुरंग भोसले यांनी सांभाळली आहे.

मुलीच्या स्वप्नासाठी आयुष्यभर झटणारा बाप

‘दशमी’मध्ये प्रभाकर स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून मुलगी लक्ष्मीने डॉक्टर व्हावं, यासाठी आयुष्यभर कष्ट करतो. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी तो अनेक अडचणींचा सामना करतो.

दुसरीकडे लक्ष्मीही वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवणारी संवेदनशील मेडिकल स्टुडंट आहे. वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न ती स्वतःचं मानून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते.

मकरंद अनासपुरे साकारणार प्रभाकरची भूमिका

प्रभाकरच्या भूमिकेबद्दल बोलताना मकरंद अनासपुरे म्हणतात, “‘प्रभाकर’ या भूमिकेतून एका वडिलांचं मुलीवरील प्रेम आणि तिच्यासाठीची धडपड अनुभवता आली. मुलीसमोर खंबीर राहूनही आतून तुटणारा प्रभाकर साकारताना हा प्रवास मनाला भिडणारा होता.”

त्यांच्या या भूमिकेतून मुलीच्या भविष्यासाठी झटणाऱ्या वडिलांची भावनिक बाजू पाहायला मिळणार आहे.

गौरी इंगवले साकारणार लक्ष्मी

गौरी इंगवलेने लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल ती सांगते की, लक्ष्मी आणि तिच्या वडिलांचं नातं साधं असलं तरी मनाला भिडणारं आहे. लक्ष्मीच्या प्रत्येक स्वप्नामागे तिच्या वडिलांचे कष्ट आहेत, याची तिला जाणीव आहे.

आयुष्यात आलेल्या संकटानंतर लक्ष्मीचं विश्व बदलतं. या बदलासोबतच वडिलांबद्दलचं प्रेम आणि त्यांच्याशी असलेली भावनिक जवळीक साकारताना हा अनुभव भावनिक असल्याचं गौरीने सांगितलं.

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

प्रत्येक वडिलांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी कथा

‘दशमी’मधील प्रभाकर आणि लक्ष्मीचा प्रवास केवळ एका बाप-लेकीची गोष्ट नसून, मुलीच्या स्वप्नांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या प्रत्येक वडिलांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी कथा असल्याचं चित्रपटाच्या कथानकावरून दिसतं.

मकरंद अनासपुरे आणि गौरी इंगवले यांच्या अभिनयातून हे बाप-लेकीचं नातं पडद्यावर किती जिवंत होतं, याची उत्सुकता आता वाढली आहे. ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Web Title: Dashmi marathi movie makrand anaspure gauri ingawale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
1

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी  ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्या
2

Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्या

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
3

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
4

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.