Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Jayanti 2 Box Office Collection: जयंती २’ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने २ कोटींचा टप्पा पार केला असून दुसऱ्या आठवड्यात २५०हून अधिक थिएटर्समध्ये ५००पेक्षा जास्त शोज आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 21, 2026 | 12:20 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jayanti 2 Box Office Collection: मराठी मनोरंजनसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘जयंती २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कॉलेजमधील भेदभावाचा गंभीर विषय मांडणाऱ्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘जयंती २’च्या दुसऱ्या आठवड्यात थिएटर्समधील शोजमध्ये मोठी वाढ झाली असून, चित्रपटाने आतापर्यंत २ कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या आठवड्यात २५०हून अधिक थिएटर्समध्ये प्रदर्शन

‘जयंती २’च्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील सुमारे १५० थिएटर्समध्ये शोज सुरू होते. मात्र, चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि त्याची होत असलेली चर्चा पाहता दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे शोज मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत.

सध्या २५०हून अधिक थिएटर्समध्ये ५००पेक्षा जास्त शोज सुरू असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. यासोबतच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

पायलच्या संघर्षाची कथा

‘जयंती २’मध्ये चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल या तरुणीची कथा मांडण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचं स्वप्न पायल पाहते. मात्र, कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिला रॅगिंगचा सामना करावा लागतो.

या त्रासाला पायलने केलेल्या विरोधातून संघर्ष उभा राहतो. या संघर्षात पुढे तिच्यासोबत काय होतं आणि तिला न्याय मिळतो का, हे चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.

मात्र, कथा केवळ पायलच्या संघर्षापुरती मर्यादित राहत नाही. कॉलेज प्रशासनाचा दृष्टिकोन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारी वागणूक तसेच सरकारची भूमिका अशा विविध मुद्द्यांवरही चित्रपट भाष्य करतो. आजच्या काळातही शिक्षणाच्या ठिकाणी भेदभावाचे प्रश्न कसे निर्माण होतात, यावर ‘जयंती २’मधून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

‘जयंती’च्या यशानंतर पुढची कथा

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता त्याच कथाविश्वाला पुढे नेत ‘जयंती २’मध्ये शिक्षण क्षेत्रातील भेदभाव आणि त्यामागचं राजकारण यांसारखे विषय मांडण्यात आले आहेत.

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी संबंधित गंभीर विषय आणि विचार करायला लावणारी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या शोजमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!

ऋतुराज वानखेडे मुख्य भूमिकेत

‘जयंती २’मध्ये अभिनेता ऋतुराज वानखेडे मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्यासोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली आहे. कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचं आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी छायांकन केलं असून फैसल महाडिक यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. गीतांना ओंकारस्वरूप यांचं संगीत असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचं आहे.

Sidharth Malhotra Kiara: सिद्धार्थ -कियारा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? बिग बॉसच्या मंचावर अभिनेत्याच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण

Web Title: Jayanti 2 box office collection marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • Box Office
  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’
1

Samay Raina: समय रैना लवकरच चढणार बोहल्यावर? ‘12th Fail’ फेम अभिनेत्रीच्या नावाची जोरदार चर्चा; म्हणाला, ‘दोन महिन्यांनंतर तर…’

Sidharth Malhotra Kiara: सिद्धार्थ -कियारा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? बिग बॉसच्या मंचावर अभिनेत्याच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण
2

Sidharth Malhotra Kiara: सिद्धार्थ -कियारा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? बिग बॉसच्या मंचावर अभिनेत्याच्या एन्ट्रीने चर्चांना उधाण

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!
3

Shruti Haasan On Periods: पुरुषांना पीरियड्स यावेत म्हणून ‘या’ अभिनेत्रीने देवाकडे केली हजारो वेळा प्रार्थना, कारणही सांगितलं!

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
4

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.