Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaye Khanna: ‘रहमान डकैत’नंतर आता असुरांचा गुरु शुक्राचार्य; ‘महाकाली’मधील अक्षय खन्नांचा खतरनाक लूक पाहून चाहते थक्क!

Akshaye Khanna: ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्ना ‘महाकाली’मध्ये असुरांचे गुरु शुक्राचार्य साकारणार आहे. अभिनेत्याचा हा अवतार त्याने यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे पहिला लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 10:40 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Akshaye Khanna:अभिनेता अक्षय खन्ना सध्या यशाच्या शिखरावर असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘दृश्यम २’, ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता अक्षय खन्ना एका वेगळ्याच आणि शक्तिशाली भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर’मध्ये रहमान डकैतची भूमिका साकारल्यानंतर आता तो पौराणिक चित्रपट ‘महाकाली’मध्ये असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारणार आहे.

‘महाकाली’मधून अक्षय खन्नांचा नवा अवतार

‘महाकाली’ हा दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा (PVCU) आगामी चित्रपट आहे. या चित्रपटातून अक्षय खन्ना तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची एक खास झलक २४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.

चित्रपटाची चर्चा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. चित्रपट निर्माता प्रशांत वर्मा आणि आरकेडी स्टुडिओने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ‘२४ ऑगस्ट – अंताची सुरुवात’ असं लिहिलं होतं. यासोबतच अक्षय खन्नांचा शुक्राचार्याच्या भूमिकेतील पहिला लूकही समोर आला.

शुक्राचार्याच्या भूमिकेत अक्षय खन्ना ओळखूही येईना!

‘महाकाली’मध्ये अक्षय खन्ना असुरांचे शक्तिशाली गुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये अक्षय खन्ना लांब दाढी, विस्कटलेले केस आणि उंच अंबाडा बांधलेल्या अवस्थेत दिसत आहेत. कपाळावरील टिळा, मातीच्या रंगाचे कपडे आणि पारंपरिक दागिने यामुळे त्यांचा लूक अधिकच रौद्र आणि प्रभावी दिसत आहे.

अक्षय खन्नांचा हा अवतार त्याने यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे पहिला लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Aishwarya Narkar New Car: ऐश्वर्या नारकरांनी खरेदी केली नवी कोरी गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क! अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

चाहत्यांकडून लूकचं कौतुक

अक्षय खन्नांचा हा नवा लूक समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या लूकचं आणि भूमिकेचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी तर हा अवतार अक्षय खन्नांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय भूमिकांपैकी एक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

‘महाकाली’मध्ये भूमी शेट्टी आणि रोहित सराफही

‘महाकाली’मध्ये अक्षय खन्नांसोबत भूमी शेट्टी आणि रोहित सराफ महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. भूमी शेट्टी ही चित्रपटात महाकालीची भूमिका साकारत असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा लूकही समोर आला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

‘महाकाली’ हा प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स (PVCU) मधील आगामी चित्रपट आहे. ‘हनु-मॅन’च्या यशानंतर भारतीय पौराणिक कथांना आधुनिक सिनेमॅटिक शैली आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची जोड देत हे विश्व विस्तारलं जात आहे. त्यामुळे अक्षय खन्नांचा शुक्राचार्याच्या भूमिकेतील हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी किती खास ठरतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.आहे.

Govinda-Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! सुनीता आहुजाने घेतला घटस्फोटाचा अर्ज मागे; मॅनेजरने केला खुलासा

Web Title: Akshaye khanna mahakali shukracharya first look after dhurandhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • Akshaye Khanna
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.