Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Pratyusha Banerjee Case: ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात 10 वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राहुल राज सिंगला दिलासा मिळाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2026 | 09:09 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pratyusha Banerjee Case: टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’मध्ये आनंदीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येला १० वर्षे झाली आहेत. २०१६ मध्ये घडलेल्या या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्रीचा माजी जोडीदार राहुल राज सिंग याला या प्रकरणातून डिस्चार्ज केले आहे.

१ एप्रिल २०१६ रोजी प्रत्युषाचा मृत्यू

प्रत्युषा बॅनर्जी अवघ्या २४ वर्षांची असताना १ एप्रिल २०१६ रोजी गोरेगाव पश्चिम येथील तिच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळली होती. ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदी या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. तिच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता.

प्रत्युषाच्या पालकांच्या तक्रारीनंतर बांगूर नगर पोलिसांनी राहुल राज सिंगविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. राहुलवर प्रत्युषाचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र राहुलने हे आरोप नाकारले होते.

२०१६ मध्ये अटकपूर्व जामीन, २०१८ मध्ये आरोपपत्र

राहुल राज सिंगला जुलै २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पोलिसांनी २०१८ मध्ये या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. राहुलने प्रकरणातून डिस्चार्ज मिळावा यासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र ऑगस्ट २०२३ मध्ये सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. त्यानंतर राहुलने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

राहुलच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?

मुंबई उच्च न्यायालयात राहुल राज सिंगच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा आणि वकील श्रेयांश मिठारे यांनी बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्युषासोबत झालेल्या शेवटच्या संभाषणात राहुल तिला कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे समजावत होता. तसेच या संभाषणातून त्याने तिच्यावर प्रेम व्यक्त केल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

वकिलांनी पुढे असा युक्तिवाद केला की, घटनास्थळी कोणतीही आत्महत्या चिठ्ठी सापडली नव्हती आणि राहुलविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे नाहीत. राहुलनेच दरवाजा उघडून प्रत्युषाला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्याचाही युक्तिवाद करण्यात आला.

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

३० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राहुल राज सिंगला या प्रकरणातून डिस्चार्ज केले. न्यायमूर्ती शिवकुमार जी. दिगे यांच्या एकल खंडपीठाने राहुलची याचिका मंजूर केली. न्यायालयाने नोंदवले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे राहुलविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खटला पुढे चालवण्यासाठी पुरेसा आधार दिसत नाही.

यापूर्वी दिंडोशी सत्र न्यायालयाने राहुलचा डिस्चार्ज अर्ज फेटाळताना साक्षीदारांच्या जबानीचा आधार घेतला होता. सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, आरोपीच्या कथित छळामुळे प्रत्युषाचे आयुष्य नरक बनले होते आणि त्या छळामुळे तिने आत्महत्या केली, असे प्रथमदर्शनी दिसत होते. उच्च न्यायालयाने मात्र राहुलच्या बाजूने मांडण्यात आलेल्या शेवटच्या संभाषणासह उपलब्ध पुराव्यांचा विचार करून त्याला डिस्चार्ज केले.

अशाप्रकारे, प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या सुमारे १० वर्षांनंतर या प्रकरणात राहुल राज सिंगला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश पुढे उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Web Title: Pratyusha banerjee case rahul raj singh discharged 10 years later

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Sucide

संबंधित बातम्या

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
1

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.