Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amir Khan Gauri Sprat ची लव्ह स्टोरी माहीत आहे का? 25 वर्ष जुनं प्रेम, बंगळुरूत झाली पहिली भेट, 5 जुलैला करणार लग्न

आमिर खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकतोय आणि हे तब्बल त्याचं ३ रं लग्न आहे. ६१ व्या वर्षी आमिर खान हा गौरी स्प्रॅटसह लग्न करणार आहे. या दोघांची लव्ह स्टोरी माहीत आहे का? कधी आणि कुठे झाली भेट?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 04, 2026 | 03:22 PM
आमिर खान आणि गौरी स्प्रॅटची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आमिर खान ५ जुलैला अडकणार लग्नबंधनात, करणार तिसरे लग्न 
  • कोण आहे गौरी स्प्रॅट
  • आमिर खान गौरी स्प्रॅटची प्रेमकहाणी, कधी आणि कुठे झाली भेट 
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ६१ वर्षीय आमिर खान उद्या, ५ जुलै रोजी त्याची होणारी पत्नी आणि उद्योजिका गौरी स्प्रॅट हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. हे आमिर खानचे तिसरे लग्न असेल. पण त्यांच्या लग्नाआधी, नक्की ही प्रेमकथी कुठे आणि कशी घडली हे जाणून घेऊया. दोघेही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखत आहेत असं सांगण्यात येत आहे. मग आमिरची दोन लग्न कशी झाली? असाही प्रश्न उपस्थित होतोय. 

बॉलीवूडमधील प्रेमकथा बऱ्याचदा मोठ्या पडद्यावर सुरू होतात, परंतु अशा काही प्रेमकथा आहेत ज्या रीलमध्ये नाही तर वास्तविक जीवनात मन जिंकतात. कधी काळ माणसांना जवळ आणतो तर कधी वर्षांचे अंतरही दोन हृदयांमधील बंध तोडू शकत नाही. पहिल्या भेटीनंतर वेगळे होणे आणि नंतर अचानक वर्षांनंतर पुन्हा भेटणे आणि मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर… अशा कथा क्वचितच पाहायला मिळतात. आमिर खान आणि गौरी स्प्रेटची प्रेमकहाणीही अशीच आहे. हे दोघे कसे भेटले याची कहाणी किती रंजक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? या नात्याची सुरुवात २५ वर्षांच्या मैत्रीतून झाली, जी हळूहळू प्रेमात बहरली. आमिर खान आणि गौरी स्प्रॅटची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही.

मुंबईच्या पावसात रंगणार आमिर खान-गौरी स्प्रॅट यांचा खास दिवस; सरींनी वाढवला रोमँटिक अंदाज

कशी होती पहिली भेट?

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांची पहिली भेट अनेक दशकांपूर्वी बंगळूरमध्ये झाली होती. मात्र, काळाच्या ओघात त्यांचे आयुष्य वेगवेगळ्या वाटांवर गेले. जवळपास २५ वर्षांनंतर ते पुन्हा एकत्र आले. यावेळी त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. आमिर आणि गौरी यांनी आपले नाते बराच काळ माध्यमांपासून दूर ठेवले होते. आमिरने मार्च २०२५ मध्ये आपल्या ६० व्या वाढदिवशी गौरीला पहिल्यांदा अधिकृतपणे जगासमोर आणले.

त्यावेळी आमिर म्हणाला होता की, त्याच्या जोडीदाराला सर्वांना भेटण्याची ही एक उत्तम संधी आहे असे त्याला वाटले. त्यानंतर त्यांचे नाते सर्वत्र चर्चेचा विषय बनले, तरीही त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे.

कोण आहे गौरी स्प्रॅट 

गौरी स्प्रॅट बंगळूरुची रहिवासी असून फॅशन, फोटोग्राफी आणि व्यवसाय या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. तिला जगाच्या झगमगाटापासून दूर राहायला आवडते. सध्या ती आमिर खान प्रॉडक्शन्ससोबत काम करत असून, तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

आपल्या नात्याबद्दल बोलताना, आमिर खानने यापूर्वी म्हटले आहे की त्याला गौरीसोबत शांतता आणि स्थैर्य वाटते. एका मुलाखतीत तो म्हणाला की, गौरी त्याच्या आयुष्यात असल्यामुळे तो स्वतःला भाग्यवान समजतो. त्याने हे देखील कबूल केले की रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबतची त्याची नाती देखील खूप घट्ट होती, पण ती वेगवेगळ्या परिस्थितीत होती. आमिर म्हणाला होता, “आता मला परिपूर्ण वाटते आहे”

कधी आहे लग्न?

आमिर खानने नुकतीच आपल्या लग्नाची पुष्टी केली आहे. तो म्हणाला, “हो, मी ५ जुलैला लग्न करत आहे. हे एक अगदी छोटेखानी लग्न आहे, आम्ही ते घरीच करत आहोत. हा आमच्यासाठी खूप खास दिवस आहे. आम्हाला सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादांची गरज आहे.” त्याने पुढे सांगितले की, हे लग्न विशेष विवाह कायद्यांतर्गत होणार असून, या सोहळ्यात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. हे आमिर खानचे तिसरे लग्न असेल. 

आमिर खानची पहिली २ लग्नं 

आमिरचे पहिले लग्न १९८६ मध्ये रीना दत्तासोबत झाले होते, ज्यांच्यापासून त्याला जुनैद खान आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, पण ते मित्र म्हणून एकत्र आहेत. 

त्यानंतर आमिरने २००५ मध्ये चित्रपट निर्माती किरण रावशी लग्न केले. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि २०२१ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. किरण आणि आमिर यांना सरोगसीद्वारे जन्मलेला आझाद नावाचा एक मुलगा आहे. विभक्त होऊनही, आमिरने आपल्या दोन्ही एक्स पत्नींसोबत चांगले संबंध जपले आहेत. आता, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट एका नवीन आयुष्याला सुरुवात करत आहेत. बऱ्याच काळाच्या खाजगी नात्यानंतर, त्यांचा हा नवीन प्रवास बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित विवाहांपैकी एक बनला आहे.

Aamir Khan आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला! ‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी; शाही मेजवानीचा मेन्यू चर्चेत

Web Title: Amir khan gauri sprat love story getting married on 5th july how superstar met his 3rd wife 25 year old love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Aamir Khan News
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
1

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
2

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
4

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.