Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anandi Ajay Breaks Down: विजय थलपतीच्या जन नायगन’ सिनेमातील ‘तो’ सीन कापला, अभिनेत्रीला अश्रू अनावर, व्हिडिओ चर्चेत

Anandi Ajay Breaks Down: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयच्या 'जन नायगन' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच तामिळ अभिनेत्री आनंदी अजय चर्चेत आली आहे. अंतिम एडिटमध्ये चित्रपटातील तिचा सीन कापण्यात आल्याने ती भावूक झाली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 26, 2026 | 04:30 PM
Tamil Actress Anandi Ajay(Photo सौजन्य-सौशलमीडिया)

Tamil Actress Anandi Ajay(Photo सौजन्य-सौशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘जन नायगन’मधील आनंदी अजयचा सीन अंतिम एडिटमध्ये कापला गेला.
  • इन्स्टाग्राम व्हिडिओद्वारे अभिनेत्रीने भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
  • थलपती विजयच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे.
Tamil Actress Anandi Ajay :दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार थलपती विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायगन’ (Jana Nayagan) बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. सुमारे ७ महिन्यांच्या उत्सुकतेनंतर 23 जुलै रोजी चित्रपटगृहांत धडकलेल्या या पॉलिटिकल अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. फारसे प्रमोशन न करताही केवळ विजयच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे या सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली होती, आणि आता दुसऱ्या दिवशीही कमाईचा हा धडाका कायम आहे. परंतू या चित्रपटातून तिचा एक सीन एडिटरने कापल्याने अभिनेत्री भावूक झाली आहे. दरम्यान तिने सोशलमीडियावर व्हिडिओ टाकून आपली खंत व्यक्त केली आहे.

अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

तामिळ अभिनेत्री आनंदी अजयने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत भावूक झालेली दिसते. बोलताना तिच्या डोळ्यांत अश्रू होते आणि मनातील खंत ती लपवू शकली नाही. ‘जन नायगन’ या चित्रपटातून तिचा भाग अंतिम एडिटमध्ये काढून टाकण्यात आल्याचं तिने सांगितलं. (Anandi Ajay Breaks Down)

विजय थलपतीसोबत काम करण्याच्या संधीने आनंदी

आनंदीने सांगितलं की, या चित्रपटात सुपरस्टार विजय थलपती यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्यामुळे ती खूप आनंदी होती. चित्रपटाच्या प्रदर्शनाची ती अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होती. मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिचा सीन अंतिम आवृत्तीत नसल्याचं समजलं आणि तिच्यासाठी तो मोठा धक्का ठरला.

Entrainment News: CJP ला अभिनेत्रीचं थेट आव्हान! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा

व्हिडिओमध्ये आनंदी काय म्हणाली तर…

व्हिडिओमध्ये बोलताना ती म्हणाली, “विजय सरांसोबत काम करण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. शूटिंग करताना अनेक आठवणी तयार झाल्या होत्या. पण चित्रपटात माझं काम दिसणार नाही, हे समजल्यावर खूप वाईट वाटलं. पुन्हा अशी संधी मिळेल की नाही, याचीही मला खात्री नाही.”

आनंदीच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

नेटकऱ्यांनी या व्हिडिओ करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी नेटकरी म्हणतात की, “एका सीनमुळे कलाकाराचं कौशल्य कमी होत नाही,” असे म्हणत तिचे सांत्वन केले. तर काहींनी, “तुझ्यासाठी यापेक्षाही मोठी संधी पुढे वाट पाहत असेल,” असा विश्वास व्यक्त केला.

कोण आहे आनंदी अजय?

आनंदी अजय ही तामिळ मनोरंजन विश्वातील परिचित अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आणि काही चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचं अनेकदा कौतुक झालं असून, आता चाहत्यांना ती लवकरच नव्या आणि मोठ्या भूमिकेत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Jana Nayagan : Vijay Thalapathy च्या शेवटच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन! सिनेमा करतोय राडा

सध्या तिचा हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काही मिनिटांच्या या व्हिडिओने अनेक कलाकारांच्या पडद्यामागील संघर्षाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. यशाच्या प्रवासात निराशेचे प्रसंग येतात, मात्र त्यातून पुन्हा उभं राहणं हेच खऱ्या कलाकाराचं बळ असतं, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Anandi ajay emotional after jana nayagan scene removed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • Entertainemnt News
  • marathi newss

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?
1

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण
2

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य
3

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
4

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.