फोटो सौजन्य - Social Media
दुसऱ्या दिवशी किती झाली कमाई?
गुरुवारी मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शुक्रवारी (दुसऱ्या दिवशी) कमाईचा वेग काहीसा शांत झाला असला, तरीही चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ४२ कोटींहून अधिकचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देशांतर्गत २१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
परदेशातही डंका; जगभरात १०० कोटींचा टप्पा पार!
केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही (Overseas) ‘जन नायगन’ची जादू पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशी परदेशी बाजारातून चित्रपटाने १० कोटी रुपये कमावले. यासह दोन दिवसांत परदेशातील एकूण कमाई ३७.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
सध्या भारतात चित्रपटाचे नेट कलेक्शन ६३.८५ कोटी तर ग्रॉस कलेक्शन ७५ कोटी रुपये झाले आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळवून ‘जन नायगन’ने अवघ्या दोन दिवसांत जगभरात तब्बल ११२.५० कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.
चित्रपटाची कथा काय आहे?
‘जन नायगन’ ही एक हाय-व्होल्टेज राजकीय अॅक्शन-थ्रिलर ड्रामा आहे. यात विजयने ‘वेट्री कोंडन’ नावाच्या माजी प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर तो आपल्या दिवंगत मित्राच्या मुलीचे रक्षण करतो. याच दरम्यान तो आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांचे तस्कर आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढा देतो. थलपती विजयचा हा अभिनय क्षेत्रातील शेवटचा चित्रपट मानला जात असल्याने, चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.






