हसणं आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. हसणं… आनंदी राहणं आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असतं असं आपण नेहमी ऐकतो. तणाव, नैराश्य दूर करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे, आनंदी राहणं. पण तुम्हाला माहितीये का? हसण्याचे जेवढे फायदे आहेत, मग तुम्हा एखादी मालिका किंवा चित्रपट पाहून भावूक होणं असो किंवा मग कांदा कापताना तुमच्या डोळ्यांत आलेलं पाणी असो.
आपल्या डोळ्यांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी अश्रू खूप महत्वाचे आहेत. यामुळे तुमचे डोळे ओलसरपणा म्हणजेच, हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांना होणारं इन्फेक्शन आणि डोळ्यांत जाणारी वातावरणातील धूळीपासून संरक्षण होतं. डोळ्यांतील अश्रूंमुळे डोळ्यांतील घाण निघून जाते आणि डोळे स्वच्छ राहतात. त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. माणूस भावूक होतो, तो रडतो. यामागील कारण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर, जेव्हा आपण इमोशनल (Emotional) होतो, कांदा कापताना, डोळ्यांत धूळ गेल्यामुळे किंवा तिखट पदार्थांमुळे अश्रू येतात. डोळ्यांतून येणारं पाणी डोळ्यांतील अश्रू नलिकांमधून बाहेर पडणारा द्रव, जो पाणी आणि मीठ यांच्या मिश्रणानं तयार होतो. यामध्ये Oils, Mucus आणि Enzymes नावाची केमिकल्स असतात. यामुळे डोळ्यांत धुळीमुळे गेलेले जंतू नष्ट होतात. परिणामी डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं आणि डोळे निरोगी राहतात.
तुम्हाला माहित आहे का, आश्रू येण्याचे प्रकार आहेत, एक म्हणजे हे अश्रू डोळ्यांची उघडझाप करताना तरळतात. हे डोळ्यांमध्ये ओलावा राखण्याचं काम करतात. दुसर म्हणजे हे अश्रू ये नॉन-इमोशनल असतात. हे अश्रूही नॉन-इमोशनल असतात. तिसर म्हणजे हे डोळ्यांत हवा, धूळ किंवा कचरा गेल्यामुळे येतात. दुःख, नैराश्य यांमुळे डोळ्यांत अश्रू येतात. म्हणजेच, हे अश्रू भावूक झाल्यामुळे येतात.






