Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ananya Raj Death: कोण होती अनन्या राज? १५ जुलैला निधन; कुटुंबाने महिनाभर का लपवून ठेवली निधनाची बातमी? मृत्यूचं कारणही सांगितलं

Ananya Raj Death: ‘Ghost’, ‘7 Hours to Go’ फेम अभिनेत्री अनन्या राजचं १५ जुलैला झोपेतच निधन झालं. वर्षभरापासून ती शारीरिक आणि मानसिक समस्यांशी झुंजत होती.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 17, 2026 | 12:46 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ananya Raj Death:अभिनेत्री अनन्या राजच्या निधनाच्या बातमीने तिचे चाहते आणि मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ‘Ghost’, ‘7 Hours to Go’ आणि ‘The Final Exit’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनन्या राजचं १५ जुलै रोजी पहाटे झोपेतच निधन झालं. तिच्या निधनाला एक महिना उलटल्यानंतर कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दुःखद बातमीची अधिकृत माहिती दिली.

झोपेतच घेतला अखेरचा श्वास

अनन्या राजच्या कुटुंबीयांनी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर भावुक पोस्ट शेअर करत तिच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “हा अनन्याचा परिवार आहे. अत्यंत दुःखाने आम्हाला सांगावं लागत आहे की १५ जुलैच्या सकाळी अनन्याचं निधन झालं. ती झोपेतच अतिशय शांतपणे हे जग सोडून गेली.”

अवघ्या २७व्या वर्षी अनन्याचं अचानक निधन झाल्याने तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते शोकाकुल झाले आहेत. तिच्या निधनाची बातमी महिनाभर सार्वजनिक न करण्यामागे कुटुंबीयांची वैयक्तिक कारणं असल्याचं दिसून येतं.

Video Viral: स्वातंत्र्यदिनी हातात पाकिस्तानी झेंडा अन् बॅकग्राउंडला भारतीय देशभक्तीपर गाणं, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

वर्षभरापासून शारीरिक आणि मानसिक समस्यांशी झुंज

कुटुंबीयांनी सांगितलं की, अनन्या मागील एक वर्षाहून अधिक काळ शारीरिक आणि मानसिक समस्यांशी झुंज देत होती. या कठीण काळात तिने परिस्थितीशी खंबीरपणे सामना केला.

कुटुंबीयांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “तिने या सगळ्याचा सामना करण्यासाठी एका योद्ध्याप्रमाणे लढा दिला.” त्यांनी अनन्याचं वर्णन मजबूत इच्छाशक्ती असलेली मुलगी अशी केली. तिने आपलं आयुष्य राणीसारखं जगलं, असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनन्याच्या मृत्यूचं नेमकं वैद्यकीय कारण कुटुंबीयांनी स्पष्ट केलेलं नाही. या कठीण काळात कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

सोशल मीडियावर चाहते व्यक्त करत आहेत दुःख

अनन्या राजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास २.७५ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या बायोमध्ये ‘Unstoppable’ असा उल्लेख होता. तिच्या व्यक्तिमत्त्वातील जिद्द आणि सकारात्मकता या शब्दातून दिसून येत होती.

अनन्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिचे चाहते सोशल मीडियावर भावुक होत आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये तिला श्रद्धांजली वाहिली असून, तिच्या जुन्या पोस्ट आणि फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

‘Ghost’, ‘7 Hours to Go’सह या चित्रपटांत केलं काम

अनन्या राजने हिंदी चित्रपटांसोबतच प्रादेशिक सिनेमातही काम केलं होतं. तिच्या फिल्मोग्राफीमध्ये ‘Ghost’, ‘7 Hours to Go’ आणि ‘The Final Exit’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

IMDbनुसार, अनन्याचा जन्म २२ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला होता. २०२२ मध्ये ती तेलुगू चित्रपट ‘Thaggede Le’ मुळेही चर्चेत आली होती. एका मुलाखतीत तिने या चित्रपटाद्वारे तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचं सांगितलं होतं. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही तिने त्यावेळी म्हटलं होतं.

अवघ्या २७व्या वर्षी अनन्या राजने घेतलेला अखेरचा निरोप तिच्या चाहत्यांसाठी चटका लावणारा ठरला आहे. तिच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे, आयुष्यातील कठीण परिस्थितीशी ती शेवटपर्यंत खंबीरपणे लढत राहिली.

Web Title: Ananya raj death who was she died july 15 family kept news secret for month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Video Viral: स्वातंत्र्यदिनी हातात पाकिस्तानी झेंडा अन् बॅकग्राउंडला भारतीय देशभक्तीपर गाणं, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
1

Video Viral: स्वातंत्र्यदिनी हातात पाकिस्तानी झेंडा अन् बॅकग्राउंडला भारतीय देशभक्तीपर गाणं, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…
2

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…

Jasmin Bhasin: ‘खतरों के खिलाड़ी 15’मध्ये धक्कादायक प्रकार! स्टंटनंतर जस्मिन भसीनला काहीच आठवेना; रोहित शेट्टी चिंतेत
3

Jasmin Bhasin: ‘खतरों के खिलाड़ी 15’मध्ये धक्कादायक प्रकार! स्टंटनंतर जस्मिन भसीनला काहीच आठवेना; रोहित शेट्टी चिंतेत

Jyoti Chandekar Death Anniversary: “आई, १ वर्ष झालं तुझ्याशिवाय…”; ज्योती चांदेकरांच्या स्मृतीदिनी तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट
4

Jyoti Chandekar Death Anniversary: “आई, १ वर्ष झालं तुझ्याशिवाय…”; ज्योती चांदेकरांच्या स्मृतीदिनी तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.