
फोटो सौजन्य - Social Media
भारतभर सध्या धुरंधर 2 चित्रपटाचा क्रेझ आहे. सोशल माध्यम असो वा Traditional माध्यमं, सगळीकडे फक्त एकच हवा आहे ती म्हणजे धुरंधर 2 चित्रपटाची! आदित्य धर यांचे दिगदर्शन असलेल्या या सिनेमाने चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ्या Filmmakers यांना कौतुक करण्याला भाग पाडले आहे. महत्वाचे म्हणजे आदित्य धर यांनी धुरंधर चित्रपटाचा क्रेझ काही कमी होऊ दिला नाही. धुरंधर OTT वर येताच अगदी महिनाभरातच त्यांनी धुरंधरचा दुसरा भाग Box ऑफिसवर आणला आणि या चित्रपटाने Box ऑफीसावर तर कहरच केली.
एका वाहिनेला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शन प्रियदर्शन म्हणाले आहेत की “Rocky Aur Rani Ki Prem Kahani च्या यशामुळे एक गोष्ट स्पष्ट होते प्रेक्षक सिनेमा ‘जुना’ की ‘नवा’ यावरून जज करत नाहीत. क्लासिक आणि ओल्ड-स्कूल स्टाइल असूनही आजच्या तरुण प्रेक्षकांनाही, माझ्या मुलीसह, हा चित्रपट आवडला. कोणताही चित्रपट यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो प्रेक्षकांना ‘२ तास थिएटरमध्ये खिळवून ठेवतो का?’ प्रत्येक चित्रपटात एक मजबूत ‘हूक’ असणे गरजेचे आहे याशिवाय दुसरी कोणतीही थिअरी नाही. Animal किंवा Dhurandhar सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे वर्तन बदलले, हे चुकीचे आहे. लोक ४ तासांचे चित्रपटही पाहायला तयार असतात, यावरून इंडस्ट्रीतील अनेक समजुती चुकीच्या असल्याचे दिसून येते.”
एकंदरीत, Animal आणि Dhurandhar सारख्या चित्रपटांनी “जर चित्रपट लहान किंवा डिड ते दोन तासांचा असला तर तो प्रेक्षकांना जास्त खिळवून ठेवतो, कंटाळवाणा नाही होत.” हा विश्वास मोडून काढला आहे. अगदी चार तासांचा चित्रपट जर त्याचा Plot तसा असेल तर तोही प्रेक्षकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेळवून ठेवतो, असा नवा विश्वास Animal तसेच धुरंधर चित्रपटाने दिला आहे.