Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Antara Banerjee Arrest: अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये RPF अधिकाऱ्यावर रेझरने हल्ल्याचा आरोप

Antara Banerjee Arrest: टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला ट्रेनमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं. RPF अधिकाऱ्यावर रेझरने हल्ल्याचा आरोप.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 16, 2026 | 03:42 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Antara Banerjee Arrest: टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी क्षेत्रात काम करणारी अभिनेत्री अंतरा बॅनर्जी सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर ३१ वर्षीय अभिनेत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अभिनेत्रीने ट्रेनच्या एसी डब्यात गोंधळ घातल्याचा आरोप असून, वादादरम्यान तिने कपडे काढले आणि आरपीएफ अधिकाऱ्यावर रेझरने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.

आरक्षित तिकीट नसतानाही एसी डब्यात प्रवास?

‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, अंतरा बॅनर्जी एका शूटिंगसाठी सुरतला जात होती. तिच्याकडे स्लीपर क्लासचं तिकीट होतं, मात्र ती आरक्षित एसी डब्यातून प्रवास करत असल्याचा आरोप आहे. एका प्रवाशाने याबाबत तक्रार केल्यानंतर वादाला सुरुवात झाली.

ही घटना बोरिवली आणि डहाणू दरम्यान रात्री सुमारे ९:३० ते १०:५० वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशाच्या तक्रारीनंतर तिकीट कलेक्टर हरिकेश त्रिपाठी यांनी आरपीएफला माहिती दिली.

यानंतर आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक यामिनीकांत मिश्रा आणि कॉन्स्टेबल राजेश कुमार यांनी घटनास्थळी हस्तक्षेप केला.

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

वाद वाढला अन् अभिनेत्रीने कपडे काढल्याचा आरोप

वाद सुरू असताना अंतरा बॅनर्जीने पोलिसांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. परिस्थिती चिघळल्यानंतर ती हिंसक झाली आणि तिने आपले कपडे काढल्याचं वृत्त आहे.

याचदरम्यान तिने रेझर ब्लेड दाखवून आरपीएफ अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या झटापटीत अभिनेत्रीही जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

एसी डब्याची खिडकी फोडून पळण्याचा प्रयत्न?

माध्यमांच्या वृत्तानुसार, वादादरम्यान अंतरा बॅनर्जीने ट्रेनच्या एसी डब्याची खिडकी फोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तिला डहाणू रेल्वे स्थानकावर उतरवलं आणि सरकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं.

अभिनेत्रीने पोलिसांचा गणवेश आणि त्यांचा फोन खराब केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा

स्वतःच्या अटकेची केली मागणी?

दुसऱ्या दिवशी सकाळी अंतरा बॅनर्जीला बोरिवली रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिला कुटुंबीयांशी किंवा कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधण्याची संधी दिली होती. मात्र, तिने त्यास नकार देत स्वतःला अटक करण्याची मागणी केल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अभिनेत्रीविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे टीव्ही आणि ओटीटी अभिनेत्री अंतरा बॅनर्जी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Web Title: Antara banerjee arrested accused of attacking rpf officer with a razor on train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
1

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
3

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.