Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mrudgandh Award 2026: लोककलेचा वारसा जपणाऱ्या कलावंतांचा गौरव! ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’साठी ‘या’ मान्यवरांची निवड

Mrudgandh Award 2026: लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृतिदिनानिमित्त २६ नोव्हेंबरला ठाण्यात संगीत समारोह रंगणार आहे. अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ प्रदान केला जाणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 16, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
Mrudgandh Award 2026: महाराष्ट्राच्या लोककलेला नवी ओळख मिळवून देणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा समृद्ध कलावारसा आजही अनेकांना प्रेरणा देत आहे. भारूड, गोंधळ आणि पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी लोककलेला मनोरंजनासोबतच जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या याच अद्वितीय कलाप्रवासाला अभिवादन करण्यासाठी पुन्हा एकदा सुरांची मैफल सजणार आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृतिदिनानिमित्त १६व्या लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. याच सोहळ्यात विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ प्रदान केले जाणार आहेत.

गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा सांगीतिक आणि सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे.

अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांना ‘मृद्गंध पुरस्कार’

कला क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी ‘मृद्गंध पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठीही विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांची निवड करण्यात आली आहे. पद्मश्री तालयोगी श्री सुरेश तळवलकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा, छायाचित्रण आणि पत्रकारितेसाठी पद्मश्री सुधारक ओळवे, अभिनय व दिग्दर्शनासाठी संदेश कुलकर्णी, अभिनय क्षेत्रासाठी अभिनेत्री अमृता सुभाष आणि नवोन्मेष प्रतिभा-गायक या विभागात चैतन्य देवडे (माऊली) यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

याबाबत बोलताना लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप म्हणाले, “लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख आहे. बाबांनी आपल्या कलेतून सर्वसामान्य माणसाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. रसिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलं आणि तेच प्रेम आज आम्हालाही मिळत आहे. बाबांचा लोककलेचा वारसा जपतानाच नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे, हेच आमचे ध्येय आहे.”

याच भावनेतून यंदा विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ

प्रियांका बर्वे आणि अरुण पेदे वेसावकर सादर करणार सांगीतिक मानवंदना

या समारोहात पार्श्वगायिका प्रियांका बर्वे, अरुण पेदे वेसावकर आणि त्यांचे सहकारी आपल्या कलाविष्कारातून लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना अर्पण करणार आहेत. या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आरपीआय नेते नानासाहेब इंदिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

लोककलेचा सन्मान, कलाकारांना प्रोत्साहन आणि समाजाप्रती संवेदनशीलता या त्रिसूत्रीवर काम करणारे विठ्ठल उमप फाऊंडेशन नंदेश उमप यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीरांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरचा हा सोहळा केवळ स्मृतिदिनापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या लोककलेचा उत्सव आणि एका अजरामर कलावंताला सुरांच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली ठरणार आहे.

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?

Web Title: Mrudgandh award 2026 vitthal umap foundation amruta subhash sandesh kulkarni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • awarded
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट
1

Panchayat Season 5: १ कोटी झेंडूंचा हार घाला, मगच रिलीज डेट सांगणार! बनराकसने प्राइम व्हिडिओसमोर ठेवली भन्नाट अट

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू
2

Actress Nimmi: जुहूमध्ये दोन आलिशान फ्लॅट, कोट्यवधींची FD अन् सोन्या-चांदीचे दागिने! अभिनेत्रीच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद सुरू

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ
3

Suraj Chavan Daughter Name: सूरज चव्हाणच्या लेकीच्या नामकरणाची जोरदार चर्चा! ठेवलं अनोखं नाव, जाणून घ्या या नावाचा सुंदर अर्थ

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?
4

Mamachya Govyala Jauya: ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ ओटीटीवर दाखल! अंकुश चौधरी-कुशल बद्रिकेचा धमाल चित्रपट कुठे पाहाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.